डोंबिवली पूर्वेत भीषण आगीची घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील सिद्धी चायनीज हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सिलेंडर ब्लास्टमुळे हॉटेलला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
डोंबिवली एमआयडीसी कंपनीतील आगीच्या घटनेनंतर बुधवारी दत्तनगर परिसरातील सिद्धी चायनीज हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 6 जण होरपळले असून त्यांच्यावर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे सुरवातीला हॉटेल मध्ये आग लागली. या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. हॉटेल मधील सिलेंडरचा ब्लास्ट होऊन 5 जण जखमी झाले आहेत.
डोंबिवली पूर्वेतील टंडन रोड जवळील सिद्धी चायनीज हॉटेलला सायंकाळी 5 च्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किट मुळे सुरवातीला हॉटेल मध्ये आग लागली. आग लागल्याचे समजताच आजूबाजूला रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांनी पुढाकार घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याच दरम्यान हॉटेल मधील सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीचा एकच भडका उडाला. या स्फोटाने नागरिक बाहेर फेकले गेले. त्वरित शेजारिच असलेल्या रुग्णालयातील कर्मचारी तसेच नागरिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
आगीची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
राजू राजभर - वय 50
अरुण अहिरे - वय 42
दिनेश शेठ - वय 34
जगदीश अरझ - वय 31
समाधान पवार - वय 44
विजय दास - वय 29
सदर घटनेत समाधान पवार व राजू राजभर हे दोघे मित्र भाजले आहेत. हे दोघे ही ड्रायव्हर आहेत. समाधान हे याच परिसरात क्रांतीनगर येथे राहतात. गाडी लावून दोघे मित्र स्टेशनच्या दिशेने निघाले होते.
याच वेळी हॉटेलला आग लागली. दोघांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेवढ्यात सिलेंडर स्फोट झाल्याने ते आगीत होरपळून बाहेर उडून पडल्याची माहिती समाधान यांची मुलगी अश्विनी यांनी दिली.
कल्याण डोंबिवली परिसरात स्फोटाची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत झालेल्या रिऍक्टर स्फोटाची घटना ताजी आहे. यामध्ये 64 हून अधिक जखमी तर 12 नागरिकांचा मृत्यू झाला असतानाच सात दिवसांत हॉटेलमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटात 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
कल्याण डोंबिवली शहर परिसर तसेच कल्याण शीळ रोडवर अनधिकृत रित्या हॉटेल्स, ढाबे, खाद्यपदार्थ गाड्या लागतात. या ठिकाणी अशा घटना घडून मोठी जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असताना देखील त्यावर कारवाई होताना दिसत नाही. हॉटेल्स, दुकानांचे फायर ऑडिट, लायसन्स तपासणी हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता तरी प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.