Shivrajyabhishek Sohala : रायगड किल्‍ला, पाचाडला छावणीचं स्‍वरूप; गडावर लाठ्या-काठ्या, भाले, शस्‍त्रे घेऊन जाण्यास मनाई

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त (Shivrajyabhishek Sohala) राज्यभरातील शिवप्रेमी किल्ले रायगडवर येऊ लागले आहेत.
Raigad Fort
Raigad Fortesakal
Updated on
Summary

किल्‍ला तसेच पाचाड परिसरात शेतकऱ्यांना पाळीव जनावरे मोकाट न सोडण्याचे आदेश दिले आहेत.

अलिबाग : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त (Shivrajyabhishek Sohala) राज्यभरातील शिवप्रेमी किल्ले रायगडवर येऊ लागले आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व मान्यवर गडावर शुक्रवारी उपस्थितीत राहणार असल्‍याने रायगड किल्ला (Raigad Fort) व परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सरकारकडून अतिदक्षता घेण्यात येत आहे. किल्ले रायगड परिसर, पाचाड व महाड (Mahad) तालुका कार्यक्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्‍मक आदेश जारी केले आहेत. जातीय तणावाच्या दृष्टीने किल्ले रायगडावर लाठ्या काठ्या, भाले, शस्‍त्रे घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Raigad Fort
Satara : 'मविआ'वर टीका करताना शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली; शिंदे म्हणाले, शरद पवार म्हणजे अंगठा..

किल्‍ला तसेच पाचाड परिसरात शेतकऱ्यांना पाळीव जनावरे मोकाट न सोडण्याचे आदेश दिले आहेत. किल्ले रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेकदिन सोहळा शुक्रवार (ता. २) ते मंगळवार (ता. ६ जून) या कालावधीत होणार असून त्‍यानिमित्त गडावर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यासाठी राज्यभरातील शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत.

शस्‍त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काव्या किंवा लाठ्या, शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल, अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्‍त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधन जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने तसेच वाकण-पाली-खोपोली मार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे.

Raigad Fort
Maharashtra Politics : लोकसभा-विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचा 'मास्टर प्लान'; 20 लाख कुटुंबांशी साधणार संपर्क

सोशल मीडियाच्या आक्षेपार्ह वापरास मनाई

व्यक्तींचे अथवा मृतदेहांचे, त्यांच्या आकृत्या, प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे, सभ्यता, नितीमत्ता यास धक्का पोचेल अशी किंवा सुरक्षितता धोक्यात येईल, आवेशपूर्ण भाषण, अंगविक्षेप करणे किंवा विडंबन करणारी चित्रे, चिन्हे फलके झळकवण्यास मनाई करण्यात आली आहे. किल्ले रायगड व पाचाड परिसरातील कोणत्याही व्यक्तींना सोशल मीडियावरील आक्षेपार्ह ध्वनिफीत, चित्रीकरण इत्यादीचे प्रदर्शन करण्यास मनाई राहील, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()