Heavy Rain Mumbai : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात; दादर, भायखळा, मस्जिद बंदर परिसरात जोरदार पाऊस

त्याचबरोबर राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
Mumbai Heavy Rains
Mumbai Heavy Rainsesakal
Updated on

Heavy Rain Mumbai : आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दादर, भायखळा आणि मस्जिद बंदर परिसरात सध्या जोरदार पाऊस कोसळतोय. पण अद्याप याचा वाहतुकीवर परिणाम जाणवत नाही, मात्र असाच पाऊस सुरू राहिला तर मुंबईची पुन्हा मुंबई होऊ शकते. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

मुंबई आणि परिसरात शुक्रवारी पावसानं शहर तसेच उपनगरांत पहाटेपासून जोरदार हजेरी लावली आहे. दादर परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु असला तरी अद्याप कुठेही पाणी तुंबलेलं नाही.

Mumbai Heavy Rains
USA Presidential Election: अखेर बायडन घेणार माघार! राष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिसबाबत केलं मोठ विधान

दरम्यान, राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कायम आहे. मोसमी पावसाचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळं गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळं आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Mumbai Heavy Rains
Infosys Freshers Hiring : इन्फोसिसमध्ये होणार फ्रेशर्स आयटी इंजिनिअर्सची मोठी भरती; जाणून घ्या प्लॅन

त्यातच रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा इथं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबई, कोल्हापूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु असून जालना, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा इथं वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.