मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ होत आहे. २० जून रोजी सकाळपर्यँत सात तलावांत मिळून एकूण १ लाख ५८ हजार १०९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. तर गतवर्षी याच दिवशी सात तलावांत मिळून एकूण ८५ हजार ५३१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता.
यंदा तलावांमध्ये ७३ हजार १७८ दशलक्ष लिटर इतका अधिक पाणीसाठा उपल्बध आहे. हा पाणीसाठा पुढील ४१ दिवस म्हणजेच ३० जुलैपर्यंत पुरेल इतका आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.
यंदा नियमित पावसापेक्षाही जास्त पाऊस पडणार असल्याचे व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत जास्त पाऊस पडून अधिक पाणीसाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार नाही.
मुंबईला, अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा,मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ तलावांमधून दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. तर मुंबईला पावसाळा संपल्यानंतर म्हणजे ३१ ऑक्टोंबरपासून पुढील वर्षभरासाठी सदर ७ तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते.
हेही वाचा: मुंबई महापालिका उभारणार 'जम्बो फॅसिलिटी' कोविड उपचार केंद्र; तब्बल 'इतक्या' रुग्णांवर होणार उपचार..
गेल्यावर्षी २० जून रोजी सात तलावांत मिळून एकूण ८५ हजार ५३१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक होता. तर यंदा याच दिवशी म्हणजे २० जून रोजीपर्यँत सात तलावांत मिळून एकूण १ लाख ५८ हजार ७०९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा सात तलावांत मिळून ७३ हजार १७८ दशलक्ष लिटर ( १९ दिवसांचा पाणीसाठा) इतका अधिक पाणीसाठा जमा आहे.
heavy rain on lakes in mumbai
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.