Mumbai News : दरडीची दहशत ! अँटॉप हिल टेकडी रहिवाशांना जीव मुठीत घेऊन दिवस काढायची वेळ

रावळी कॅम्प परिसराजवळ असणाऱ्या हेमंत मांजरेकर मार्गावरील सलामत हिल म्हणजेच टेकडीला झोपडपट्ट्यांनी कवेत घेतले आहे.
Mumbai News : दरडीची दहशत ! अँटॉप हिल टेकडी रहिवाशांना जीव मुठीत घेऊन दिवस काढायची वेळ
Updated on

Mumbai : अँटॉप हिल भाग नावाप्रमाणेच टेकड्यांचा भाग आहे. अनेक बांधकामे टेकड्यांवर आणि टेकड्यांच्या खाली आहेत. या भागात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. रावळी कॅम्प परिसराजवळ असणाऱ्या हेमंत मांजरेकर मार्गावरील सलामत हिल म्हणजेच टेकडीला झोपडपट्ट्यांनी कवेत घेतले आहे.

Mumbai News : दरडीची दहशत ! अँटॉप हिल टेकडी रहिवाशांना जीव मुठीत घेऊन दिवस काढायची वेळ
Mumbai Rain: मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

या भागात दोनशे ते अडीचशे घरे आहेत. यापूर्वी येथे दरडी कोसळण्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर पालिकेने या टेकडीला संरक्षण भिंत बांधून सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला.

अशीच परिस्थिती जवळील गांधींच्या महादेव मंदिर टेकडीच्या आहे. या टेकडीला भोवतीदेखील दगडांची संरक्षण भिंतीचा आधार देण्यात आला आहे. कोकरी आगार परिसरामध्ये ३०० पेक्षा अधिक झोपड्या या टेकडीच्या खाली आहेत.

दरडी कोसळण्याच्या घटना ऐकून चिंता वाढली आहे. येथील रहिवासीदेखील दहशतीखाली असून आमच्यासाठी याच जागी पुनर्वसन प्रकल्प राबवावा ही विनंती.

- प्रदीप जैस्वाल, रहिवासी

पावसाळ्यात आम्हाला पालिका नोटिसा देते; मात्र आम्ही घरे सोडून जायचे कुठे, हा गंभीर प्रश्‍न आहे.

- संतोष कोलीपल्ला, रहिवासी

पालिकेने लोकांना तात्पुरते स्थलांतरित करून त्या दरडी काढाव्यात. त्यानंतर राहिवाशांचे मूळ जागी पुनर्वसन करावे. यासाठी सर्वांना विश्वासात घ्‍यावे.

- मंगेश सातमकर, माजी नगरसेवक

Mumbai News : दरडीची दहशत ! अँटॉप हिल टेकडी रहिवाशांना जीव मुठीत घेऊन दिवस काढायची वेळ
Mumbai Water Supply Lakes Level : दिलासादायक बातमी! पाणी कपात लवकरच रद्द होणार; ७ तलावांमध्ये 'इतका' पाणीसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.