मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी सातपासून सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी, यासाठी राज्य पोलिस दलाने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला आहे. यासाठी राज्यभरातील मतमोजणी केंद्रांभोवती त्रिस्तरीय सुरक्षा कडे तयार केले आहे. त्यात केंद्रीय, राज्यस्तरीय यंत्रणा आणि स्थानिक पोलिस असे सुमारे दोन लाख पोलिस रस्त्यावर उतरणार आहेत.