मुंबई: मुंबईत आता रक्ताचा तीव्र तुटवडा भासू (shortage of blood) लागला आहे. मुंबईत सुरू असलेले लसीकरण शिवाय, वाढलेल्या शस्त्रक्रियांमुळे मुंबईत (Mumbai) तीव्र रक्त तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे प्रभारी डॉ. अरुण थोरात यांनी साांगितले की, "संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या फक्त 22 हजार युनिट रक्तसाठा (22 thousand available blood unit) आहे. तेच आधी या कालावधीत 40 ते 50 हजारांहून अधिक युनिट रक्तसाठा असायचा. म्हणजेच, जवळपास अर्ध्यावर रक्तसाठा आला आहे. तर, मुंबईत फक्त 3,200 युनिट एवढाच रक्तसाठा आहे. जो साधारणपणे 5 हजारांपर्यंत असतो" (Heavy shortage of blood in mumbai)
“कोविड -19 महामारी आणि त्यानंतर आता सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेमुळे रक्तदानास अडथळा निर्माण झाला आहे. ज्या लोकांना लस दिली जाते ते 14 दिवसांपर्यंत रक्तदान करू शकत नाहीत. साठवणूक करण्यात ही मोठी अडचण ठरली आहे" असेही डॉ. थोरात यांनी सांगितले.
कोविड -19 विरुद्ध महाराष्ट्रात सरासरी दिवसाला 4.29 लाख लोकांचे लसीकरण केले जाते. जेजे रुग्णालयाचे प्रभारी डॉ. हितेश पगारे म्हणाले की, "रूटीन शस्त्रक्रिया वाढल्यानेही रक्ताची मागणी वाढली आहे. आता शहर टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे, म्हणून रूग्णालयांनी नियमित कामकाज सुरू केले आहे. रक्ताची मागणी वाढली आहे पण दान वाढलेले नाही” असे पगारे म्हणाले.
जे.जे रुग्णालयात दरमहा 2500 युनिट रक्त लागते. पण, आता 1500 युनिट एवढे रक्त मिळत आहे. थॅलेसीमियाच्या रुग्णांना या कमतरतेचा सर्वाधिक फटका बसला आहे. थॅलेसीमियाच्या रुग्णांना आठवड्यातून दोनदा रक्त बदलावे लागते. पण, त्यांनाही रक्त तुटवड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सामूहिक शिबीरं भरवण्याची गरज -
दरम्यान, राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्या आणि इतर संस्थांना सामुहिक शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी मिळून या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे असेही डॉ. थोरात यांनी सांगितले.
रक्ताची उपलब्धता
रक्तपेढी युनिट (9 जुलैपर्यंत )
केईएम 56
सेंट जॉर्ज 04
जेजे 54
कूपर 58
जीटी 18
भाभा 14
सायन 17
नायर 116
टाटा 366
वी.एन.देसाई 19
बीडीबीए 16
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.