या क्षणीही जाऊ शकता कोकणात, पण चाकरमान्यांसाठी 'ही' अट कायम

या क्षणीही जाऊ शकता कोकणात, पण चाकरमान्यांसाठी 'ही' अट कायम
Updated on

मुंबईः  गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोविड १९ ची चाचणी करणं बंधनकारक असल्याच्या राज्य सरकारनी घेतलेल्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या परिस्थितीत सरकारनं घातलेले निर्बंध योग्य असून या निर्बंधांमुळे भाविकांच्या कोणत्याही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं नसल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. 

४ ऑगस्ट २०२० ला सरकारनं काढलेली अधिसूचना न्या. के.के. तातेड आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानं योग्य ठरवली.  तसंच कोकणातील लोक सुरक्षित राहावेत आणि तेथील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये किंवा संपर्कात येऊ नये, यासाठी राज्य सरकारनं ही अधिसूचना काढली, असे निरीक्षण उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

काय आहेत राज्य सरकारचे नियम 

  • १३ ऑगस्टपासून आणि त्यानंतर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना ४८ तास अगोदर कोविड-१९ ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करून घ्यावी लागेल.
  • या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असला तरच कोकणात जाता येईल. जिल्ह्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनानं तसंच यापूर्वीच जाहीर केलं आहे. 
  • एसटी बसनं कोकणात येण्यासाठी ई-पासची गरज लागणार नसून मात्र इतर खासगी गाड्यांनी येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक असेल.
  • मोठ्या संख्येनं मुंबईतून कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांची संख्या पाहता एसटी गाड्यांची संख्याही मोठी असते. यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट लक्षात घेता परिवहन मंडळाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खास कोकणासाठी ३ हजार एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

high court State Government decision Covid 19 test mandatory going kokan

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.