मनसेच्या मोर्चावर नजर ठेवण्यासाठी दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तसंच CCTV तैनात

मनसेच्या मोर्चावर नजर ठेवण्यासाठी दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तसंच CCTV तैनात

Published on

मुंबई - "या देशात आलेले बांगलादेशी मुसलमान आणि पाकिस्तानी मुसलमान यांना हाकलून देण्याची गरज आहे, मोर्चाला उत्तर मोर्चाने म्हणत राज ठाकरे यांनी गोरेगाव हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा महामहामोर्चा आयोजित केलाय. आज दुपारी १२ वाजता या मोर्चाला सुरवात होणार आहे. दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोर्चासाठी मोठ्याप्रमाणात मनसैनिक मुंबईत दाखल झालेत. महाराष्ट्रात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तान्यांविरोधात राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

असा असेल मोर्चाचा बंदोबस्त?   

मोर्चेकऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर मनसेच्या मोर्च्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी गिरगाव जवळील पारसी जिमखाना येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यानानंतर मोर्चेकऱ्यांना पायी चालत आझाद मैदान गाठावे लागणार आहे.

आजच्या मोर्च्यात राज्यभरातील मनसैनिक सहभागी होणार असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीसांच्या तुकड्या ही दाखल झाल्या आहेत.

मोर्चेकऱ्यांमुळे वाहतुकीस कोणताही अडथळा येऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणार असल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले. 

high security in mumbai due to mns rally against illegal immigrants of pakistani and bangladeshi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.