Mumbai Accident : मुंबई - ड्रंक ड्रायव्हिंग प्रकरणात हीतेन देसाई(५३) या व्यक्तीला खार पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. वांद्रे लिंकिंग रोडवर दारूच्या नशेत कार चालवत नागरिकांना जखमी करणे, अन्य वाहनांचे नुकसान करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे, असे आरोप त्च्यात्यांच्वह्यावरर आहेत.
देसाई इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्पादित करणाऱ्या एका अग्रगण्य कंपनीचा प्रमुख असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याबाबत खातरजमा सुरू असल्याचे समजते.
खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री आठच्या सुमारास देसाई आपल्या लाल रंगाच्या क्रेटा कारमधून एका महिलेसह जात होते. लिंकिंग रोड परिसरात त्यांच्या कारने अन्य एका कारला धडक दिली. या कारचालकाने पाठलाग केला तेव्हा देसाई यांनी थांबून चर्चा करण्याऐवजी आपली कार आणखी दामटवली.
लिंकिंग रोड येथे नेहमीप्रमाणे गर्दी असल्याने देसाई यांची कार रस्त्याकडेला खरेदीसाठी उभ्या एका दाम्पत्याला धडकली. हा प्रसंग पाहून गर्दीने त्यांची कार अडविण्याचा प्रयत्न केला. तोवर त्याच परिसरात गस्तीवर असलेले पोलीसही तेथे पोचले.
पोलिसांना पाहून देसाई यांनी आपली कार नागरिकांच्या गराड्यातून बाहेर काढण्याची धडपड केली. त्यात आणखी काही नागरिक जखमी झाले. तर देसाई यांच्या स्वतःच्या कारसह अन्य वाहनांचेही नुकसान झाले.
पुढे अडीच किलोमिटर अंतरावर असलेल्या पाली हील परिसरात वाहतूक पोलीस आणि खार पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने देसाई यांना ताब्यात घेतले. ते माद्याच्या अमलाखाली होते का याची चाचपणी खार पोलिसांनी केली. ही चाचणी सकारात्मक आल्याने देसाई मद्य पिऊन वाहन चालवत होते हे निष्पन्न झाल्याची माहिती खार पोलिसांनी दिली.
पोलिसांनी देसाई यांच्याविरोधात २७९, ३३६, ३३८, ३०८, ३५३, १८४, १८५ मोटार वाहन अधिनियमातील १३४(अ), १३४(ब) या कलमानुसार गुन्हा नोंदवला. त्यांना रात्री उशिरा आटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.