Mumbai School Holiday: मुंबई, ठाणे, पालघरमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर!

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो आहे. यामुळं विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून अनेक रेल्वेगाड्या देखील रुळांवर पाणी आल्यामुळं रखडल्या आहेत.
Ganesh Chaturthi Schools Holiday Karnataka Government
Ganesh Chaturthi Schools Holiday Karnataka Governmentesakal
Updated on

Mumbai School Holiday : मुंबईमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत साम टीव्हीशी बोलताना माहिती दिली. उद्या शाळेसाठी घराबाहेर पडताना विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं केसरकर यांनी सांगितलं आहे. तसंच ठाणे महापालिका आणि पालघरमधील शाळांनाही उद्या सुटी असणार आहे, असं संबंधित महापालिकांनी जाहीर केलं आहे.

Ganesh Chaturthi Schools Holiday Karnataka Government
Pune Baner Road Traffic Jam: पुण्यातील बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी! कामावरुन घराकडं निघालेले पुणेकर वैतागले

केसरकर म्हणाले, "मुंबईत उद्या सकाळी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तसंच शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं ते ओसरायला उद्याचाही दिवस जाणार आहे. याकाळात सकाळी शाळेसाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच पाण्याचा निचरा व्हावा यासाठी कन्ट्रोल रुम परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे" Mumbai School Holiday Latest Marathi News

दरम्यान, मुंबई महापालिकेनं ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटनुसार, हवामान विभागानं उद्या मुंबई महानगरला सकाळी साडेआठ पर्यंत अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. तसंच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Ganesh Chaturthi Schools Holiday Karnataka Government
Mumbai Rain: मुंबईसह पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, सकल भागात साचले पाणी, वाहतुकीला अडथळा

ठाणे, पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर

दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्र तसंच पालघरमधील शाळांनाही मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेनं पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

Ganesh Chaturthi Schools Holiday Karnataka Government
Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

पूर्व उपनगरात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका आहे. यामुळं स्लोअप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. फास्टट्रॅकवरील वाहतूक अतिशय धिम्यागतीनं सुरू आहे. तर विक्रोळी ते भांडुप परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, अशी माहिती सामच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.