कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून धारावीकरांसाठी विशेष सोय; सुरु होणार महत्त्वपूर्ण सुविधा

कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून धारावीकरांसाठी विशेष सोय; सुरु होणार महत्त्वपूर्ण सुविधा
Updated on

मुंबई, ता. 15 : धारावीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी पालिकेने टेस्टिंगसाठी होम सर्व्हिस सुरू केली आहे. मोबाईल व्हॅन टेस्टिंगच्या माध्यमातून हाय रिस्क व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागल्याचे दिसते. धारावीमधील कामगार वर्ग मोठ्या संख्येने कामानिमित्त मुंबईतील अन्य परिसरात जात आहे. कामगार कामावर पुन्हा रुजू झाल्याने आता कुणीही क्वारंटाईन व्हायला तयार होत नाही. त्यामुळे धारावीसह माहीम आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विशेष चाचणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

टाळेबंदीच्या काळात धारावीमधील परप्रांतीय कामगाराने आपल्या गावची वाट धरली होती. यापैकी बहुतांश कामगार पुन्हा धारावीत दाखल झाले आहेत. हे कामगार दररोज कामानिमित्त मुंबईच्या अन्य भागात ये जा करतात. शिवाय धारावी, दादर सारख्या परिसरात मोठ्या बाजारपेठा असल्याने तिथेही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. 

पालिकेच्या जी उत्तर विभागात धारावी, दादर, माहीम सारखा दाटीवातीचा परिसर येतो. या परिसरात लाखो लोकं जात-येत असतात. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या 'जी-उत्तर' विभागाने धारावीसह दादर, माहीम भागात पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर मोबाईल चाचणी शिबिरे सुर केली आहेत.

चाचण्यांसाठी मोबाईल व्हॅन तयार करण्यात आल्या आहेत. बाधित सापडलेल्या परिसरात व्हॅनच्या माध्यमातून हाय रिस्क व्यक्तींच्या चाचण्या मोफत करण्यात येत आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांना चाचणी करण्यासाठी बाहेर जाण्याची किंवा आपला अतिरिक्त वेळ देण्याची गरज नाही. धारवीमध्ये 15 शिबिर घेण्यात येत असून हाय रिस्क संपर्क झालेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार या शिबीरांची संख्या वाढवण्यात येईल असं सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं. 

home delivery of testing specially for the citizens to avoid second wave of covid 19

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.