मुंबई- केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. गणपती उत्सवाच्या निमित्त शहा यांनी वर्षा आणि सागर बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तसेत, लालबागच्या राजाचे दर्शन देखील घेतले. याकाळात शिंदे आणि फडणवीस अमित शहांसोबत उपस्थित होते.
अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांची उपस्थिती नव्हती. अजित पवार कुठेच दिसले नसल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार काल रात्रीच बारामतीमधून मुंबईमध्ये आले आहेत. असे असताना त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली नाही. त्यामुळे चर्चांना उधाण येणे साहजिकच होतं.