Amit Shah: सहकार संदर्भहीन होतोय हा गैरसमज डोक्यातून काढा, तो आणखी तेजाने उजळणार; अमित शाहांना विश्वास

Amit Shah
Amit Shah eSakal
Updated on

मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लक्ष्मणराव इनामदार यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, हा भाग्याचा क्षण आहे, कारण मुंबई विद्यापीठाच्या या सभागृहात लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानमालेत सहकार विषयावर बोलण्यासाठी उभा भरवण्यात आली आहे.

लक्ष्मणराव परिसा प्रमाणे होते, ते केवळ लोखंडाजवळ जायचे आणि त्याला सोनं बनवायचे. अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांनी घडवले. गुजरातचं जीवन संपन्न आहे. त्यात त्यांचं भक्कम योगदान आहे. देशातील सहकाराच्या क्षेत्रातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. सहकार भारतीच्या माध्यमातून सहकारासाठी ते अंतिम क्षणापर्यंत कार्यरत होते, असं शाह म्हणाले.

निस्वार्थ जीवन जागून सुगंधाची निर्मिती कशी करावी ते वकील साहेबांच्या आयुष्याकडे पाहून समजते. ते माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरक आहेत, असंही ते म्हणाले.

Amit Shah
Amit Shah in Mumbai: अमित शाहांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बंद दाराआड चर्चा; आमदार अपात्रता विषयी...

सहकार विषयी अमित शहा काय म्हणाले?

भारताला सहकार चळवळ नवीन नाही. सहकारात सोशलिस्ट आणि कॅपलिस्ट असे दोन मॉडेल होते. 1960 नंतर सहकारात राजकीय हस्तक्षेप सुरू झाले, तसेच काही राजकीय हालचालीही झाल्या त्यामुळे नुकसान झालं. अमूल 60 हजार कोटींचा व्यापार करतं आणि 36 हजार भगिनी प्रत्येकी शंभर रुपय गुंतवून काम करत आहेत. मास प्रोडक्सन आणि प्रोडक्शन वीथ मास दोन्ही आवश्यक आहे, हेच भारताला पुढे घेऊन जाईल, असं ते म्हणाले.

भारताचे हे सहकाराचे मॉडेल मानव केंद्रित मॉडेल आहे. मोदींनी सहकार खात्याची निर्मिती करून सहकार चळवळीत प्राण फुंकले. 2014 पूर्वी देशातील 60 कोटी लोक सहकाराशी जोडेल गेले नव्हते, ते आता देशाच्या विकासात योगदान देऊ इच्छित आहेत. त्यांना सहकार हेच एक माध्यम आहे. 60 कोटी जनतेला मोफत औषध उपचार, 5 लाखाचा विमा, मुलभूत गरजा पुरवल्या. त्याला सतावणाऱ्या समस्या मोदी सरकारने सोडवल्या असं शाह म्हणाले.

Amit Shah
Amit Shah in Mumbai: अमित शाहांमुळेच राज्यात मागील वर्षी क्रांती झाली; एकनाथ शिंदेंनी दिली कबुली

सहकार आणखी उजळणार

मोदी सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्था आणि एकूणच अर्थकारणाला गती दिली. येत्या काही वर्षात primary agricultural credit society (PACS) स्थापित करून विविध कामे केली जाणार आहेत. विविध क्षेत्राचे सहकाराविषयीचे दृष्टिकोन समजून घेण्यासाठी काम केले जाईल. येत्या काही वर्षात प्रायमरी अॅग्रिकलचर क्रेडिट सोसायटी स्थापित करून विविध कामे केली जाणार आहेत, असं ते म्हणाले.

विविध क्षेत्राचे सहकाराविषयीचे दृष्टिकोन समजून घेण्यासाठी काम केले जाईल. साखर कारखान्यांना केलेले सहकार्य, विविध करांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. येत्या काळात सहकारात नवनवीन प्रयोग केले जातील, सहकार संदर्भहीन होत आहे हा गैरसमज डोक्यातून काढा. सहकार आणखी तेजाने उजळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()