Devendra Fadnavis Office: फडणवीस यांच्या कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड; मंत्रालयात नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis Office Vandalised In Mantralaya: मुंबईत मत्रालयातून सतत कोणत्या ना कोणत्या अपप्रकार घडल्याच्या बातम्या समोर येत असतात.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisEsakal
Updated on

मुंबईत मत्रालयातून सतत कोणत्या ना कोणत्या अपप्रकार घडल्याच्या बातम्या समोर येत असतात. आता अशात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात घुसून एका महिलेने तोडफोड केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंत्रालयाची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

दरम्यान मंत्रालयात कायमच मोठा बंदोबस्त असतो आणि अशात थेट गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड आणि नासधूस होण्याची घटना कशी काय घडू शकते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान इतकी सुरक्षा असूनही असा प्रकार घडल्यामुळे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचेच कार्यालय सुरक्षित नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Devendra Fadnavis
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते विधानसभा निवडणूक; मतदान अन् निकालाची संभाव्य तारीख समोर

फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड करणारी महिला मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या पासशिवाय सचिव गेटमधून मंत्रालयात आली आणि थेट घोषणाबाजी करत तोडफोड करू लागली.

दरम्यान या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तिचा शोध सुरू आहे. अद्याप या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कोणतेही वृत्त नाही.

हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक मंत्री, आमदार आणि नेत्यांनी मंत्रालयाच्या सुरक्षेतेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis
Bangladeshi Women Mumbai: कागदपत्रे तर बनावट होतीच पण... बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरमधून अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()