मुंबई : कर्करोगावर आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रभावी असल्याचा दावा केला जातो; परंतु तिची लाभदायकता तपासण्याची प्रमाणित प्रक्रिया नाही, अथवा प्रयोगाद्वारे डेटा तयार करण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर टाटा कर्करोग रुग्णालयात आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर अभ्यास केला जात असून, डेटा बनवण्याचे काम सुरू आहे. कर्करोग व संबंधित इतर व्याधींवरही आयुर्वेदिक उपचार किती प्रभावी ठरतात, याची तपासणी सुरू असल्याचे टाटा मेमोरियल सेंटरच्या शैक्षणिक विभागाचे संचालक श्रीपाद बनावली यांनी सांगितले.
उपचार झाल्यानंतरही अनेक प्रकारचे कर्करोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. त्यावर आयुर्वेदिक औषधे उपयुक्त ठरतील का, यावर प्रयोग सुरू आहेत. कर्करोगावरील औषधांमुळे आरोग्यावर इतर दुष्परिणाम होतात. काही उपचारांत मज्जातंतूंना हानी पोहोचते. आयुर्वेदिक औषधांमुळे हे नुकसान रोखता अथवा कमी करता येऊ शकते का, याबाबतही टाटा रुग्णालयात अभ्यास सुरू आहे. त्यासाठी प्रमाणित प्रकिया वापरण्यात येत आहे.
योगासनांच्या उपयुक्ततेबाबत संशोधन
कर्करोगावरील उपचारांत योगाभ्यासाचीही मदत होईल का, याबाबत संशोधन सुरू आहे. कर्करोगावरील उपचारानंतर रुग्णांना काही व्यायाम करावे लागतात. आम्ही ८०० रुग्णांपैकी काही जणांना प्रमाणित व्यायाय व उर्वरित रुग्णांना योगासने करण्यास सांगितले. योगासने करणाऱ्यांमध्ये केमोथेरपीच्या वेदना सहन करण्याची शक्ती वाढल्याचे दिसले, अशी माहिती टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.
१२ फेब्रुवारीला बैठक
आयुष मंत्रालय कर्करोगावर आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करता येऊ शकतो का, यावर काम करत आहे. त्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर व इतर संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आराखडा तयार केला जात आहे. याबाबत आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून, तिसरी बैठक १२ फेब्रुवारीला होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.