मुंबई- अल्पवयीन अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदिवली येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले असल्याचं पाहून शेजाऱ्याने हा प्रकार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जबरदस्ती घरात प्रवेश करत अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी २३ वर्षीय नराधमाला अटक केली आहे. घडलेल्या प्रकारानंतर मुलगी काही दिवस काही बोलत नव्हती. त्यामुळे आईला शंका आली. आईने मुलीला धीर देऊन विचारणा केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला आहे.