वैद्यकीय अधिकारी नसल्याने दवाखाना बंद, दहिसर परिसरातील रुग्णांची गैरसोय

hospital.
hospital.
Updated on

मनोर : वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेचा दहिसरचा मानोर गावातील आयुर्वेदिक दवाखाना गेल्या दोन आठवड्यांपासून बंद आहे. त्यामुळे दहिसर परिसरातील आदिवासी आणि गरजू रुग्णांना खासगी डॉक्‍टरांकडे वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. या कारणाने कोरोना काळात रोजगार नसलेल्या ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेवर अवलंबून असलेल्या रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. 

दहिसर, गुंदावे, साखरे, नावझे आणि गिराळे या गावांमधील ग्रामस्थांना वैद्यकीय उपचारासाठी दहिसरचा जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखाना सोयीचा आहे. मोफत मिळणाऱ्या उपचारामुळे दहिसरच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मासवन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मनोरचे ग्रामीण रुग्णालय दहिसर पासून लांब असल्याने रुग्णांचा वेळेचा अपव्यय आणि प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागतो. गेल्या दोन आठवड्यापांसून वैद्यकीय अधिकारी नसल्याने दहिसरचा आयुर्वेदिक दवाखाना बंद आहे. त्यामुळे येथील रुग्णांचे हाल होत आहे. गरजू आणि आदिवासी रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे दहिसरच्या दवाखान्यात तातडीने वैद्यकीय अधिकारी नियुक्त करून दवाखाना सुरू करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि गरजू रुग्णांकडून केली जात आहे. 

खासगी डॉक्‍टरांकडे उपचार
दोन आठवड्यांपासून दहिसरचा दवाखाना बंद आहे. दवाखाना कधी सुरू होईल याबाबत माहिती मिळत नसल्याने दररोज सकाळी अनेक रुग्ण दवाखान्यासमोर येऊन डॉक्‍टर येण्याची वाट पाहत बसतात. परंतु डॉक्‍टर नसल्याने अकरा वाजेनंतर खासगी डॉक्‍टरांकडे उपचारासाठी जावे लागत असल्याचे दवाखान्याशेजारील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

माहिती घेऊन दहिसरच्या आयुर्वेदिक दवाखान्यात तातडीने वैद्यकीय अधिकारी व्यवस्था करण्यात येईल. 
- डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर. 

(संपादन : वैभव गाटे)

Hospital closed due to absence of medical officers in dahisar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.