गेले 8 महिने पगार आलेला नाही; मात्र कोरोनात कामावर येऊन बजावतायत कर्तव्य

गेले 8 महिने पगार आलेला नाही; मात्र कोरोनात कामावर येऊन बजावतायत कर्तव्य
Updated on

उल्हासनगर - माथाडी कामगार संलग्न सुरक्षा रक्षक मंडळातीळ 3 विधवा महिलांसोबत 15 जण उल्हासनगरातील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयात रक्षाकांचे काम करत आहेत. मात्र गेल्या 8 महिन्यापासून पगारच मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपसमारीचे संकट ओढवल्यावरही ते कोरोनात कर्तव्य  बजावतायत आणि संवेदनशील परिस्थितीत काम करत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात किंबहूना रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा, पोलिस आरोग्यसेवा यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. त्यात सरकारी रुग्णालयाची सुरक्षा व शिस्त अहोरात्र सांभाळणारे सुरक्षारक्षकही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गेल्या तीन वर्षापासून हे रक्षक रुग्णालयाच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे. त्यांना 18 हजार पगार असून काही लांबून कामाला येत असतात.

पण 7 महिन्यापासून पगारासाठी चालढकलपणा करण्यात येत असल्याने रक्षकांनी मागच्या महिन्यात प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे, तहसीलदार विजय वाकोडे, मध्यवर्ती  पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांना निवेदन देऊन काम बंद करण्याचा इशारा दिला होता. तरीही पगार मिळत नसल्याने संतप्त झालेल्या रक्षकांनी 30 मार्च रोजी काम थांबवले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी मध्यस्थी केल्यावर त्यांनी काम सुरू केले. सुरक्षा रक्षकांनी मंडळाला आमच्याकडे येण्याजाण्यासाठी काहीच रुपये नाहीत अशी विनंती केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनीही मंडळाचे अधिकारी यांना फोनाफोनी केल्यावर काल दुपारी त्यांच्या खात्यात 15 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

hospital security guards are not paid for eight months yet they are doing duty during covid crisis

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.