मुंबई : महानगरपालिकेच्या संयुक्त तपासणी कक्षामार्फत जानेवारी महिन्यापासून 10 हजार 800 हॉटेल्स आणि उपहारगृहांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 हजार हॉटेल्समध्ये अग्निसुरक्षा कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे आढळले. तर, नऊ हजार 921 बेकायदा सिलेंडर जप्त करण्यता आले आहेत. यात कुलाबा येथील प्रसिध्द गार्डन हाऊस या हॉटेलचाही समावेश आहे. फक्त तळमजल्यावरील हॉटेलला परवानगी असतानाही पाच मजले या हॉटेल मध्ये वापरले जात होते.
महत्त्वाचे : मॅडम सुट्टे पैसे घ्या आणि पाचशेची नोट द्या ना...
अग्निसुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या हॉटेल्स आणि उपहारगृहांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यात त्यांच्याकडून दंड वसुल करून दिलेल्या मुदतीत अग्निसुरक्षेचे उपाय करणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर या पथकाने 2 हजार 486 व्यावसायिक इमारतींची तपासणी केली. त्यातील 208 इमारतींना कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. या नोटीसनंतरही 59 इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक उपाय केले नाही त्याच्या विरोधात न्यायालयीन कारवाई सुरु करण्यात आली आहे.
नोव्हेंबर मध्ये या पथकाने कुलाबा गेट वे ऑफ इंडिया जवळील गार्डन हाऊस हॉटेलची पाहाणी केली होती. त्यात फक्त तळमजल्यावरील हॉटेलला महापालिकेने परवानगी दिली आहे.तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर पब आहे. मात्र,वरील पाचही मजल्यांसाठी महापालिकेने परवानगी दिलेली नाही. तरीही हॉटेल सुरु असल्याने याबाबतची माहिती कक्षाने ए विभागाच्या सहाय्याक आयुक्तांना दिली आहे. पुढील कारवाई विभाग कार्यालयामार्फत करण्यात येईल असे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांदळे यांनी सांगितले.
31 डिसेंबर 2017 मध्ये कमाल मिल कंपाऊड मधील दोन हॉटेल्समध्ये लागलेल्या आगीनंतर महापालिकेने हॉटेल्स तसेच इमारतींमध्ये अग्निसुरक्षेची तपासणी करण्यासाठी विशेष कक्ष तयार केले आहे. यात, विभागातील अभियंते, आरोग्य अधिकारी अग्निशमन दलाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या कक्षामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.
WebTitle : hotels in mumbai do not have proper fighting units
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.