'कसे' केले जातात कोरोना रुग्णांवर उपचार? जाणून घ्या सर्व माहिती...

'कसे' केले जातात कोरोना रुग्णांवर उपचार? जाणून घ्या सर्व माहिती...
Updated on

मुंबई :जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. जगभरात कोरोनानं २०००० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. भारतात कोरोनाचे तब्बल ७०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. देशात सगळीकडे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र योग्य उपचार घेतल्यामुळे नॉवेल कोरोना  व्हायरसमुळे होणारा COVID19  रोग बरा होऊ शकतो. आतापर्यंत १९ नागरिकांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णानाच्या संख्येवरून हा रोग बरा होतो हे आता स्पष्ट झालंय. 

सध्या तरी कोरोनावर लस किंवा औषध उपलब्ध नाही. मात्र काही  नेहमीच्या औषधांनीही कोरोना बरा होऊ शकतो. एखाद्याला कोरोना व्हायरसची बाधा झाली तरी योग्यवेळी उपचार घेतल्यामुळे आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमुळे कोरोनावर मात करता येते. कोरोनासाठी औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेणं आवश्यक आहे. त्यासाठीच या रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली अलगीकरण कक्षात ठेवलं जातंय. काही औषधं सध्यातरी कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करत आहेत.

कशी घेतायत डॉक्टर्स स्वतःची काळजी 

PPE किट्सच्या मदतीने डॉक्टर स्वतःची काळजी घेत आहेतच. अशातच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या हायड्रॉक्सी क्लोरिक्विन हे मलेरियावरील गुणकारी औषध दिलं जातंय. यामुळे डॉक्टर्स , नर्स आणि आरोग्य कर्मचारी स्वतःला कोरोनापासून दूर ठेऊन शकतायत. हे औषध कोरोना बाधितांना देण्यात यावं का ? यावर अजूनही संशोधन सुरु आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉक्टरांच्या निगराणीत आरोग्य कर्मचाऱ्यांना या गोळ्या दिल्या जातायत.  

असे होतात कोरोनाग्रस्तांवर उपचार:

  • रुग्ण Novel Corona Virus Covid 10 Positive असेल तर त्याला अँटीव्हायरल असलेली ऑसेलटॅमीवीर (टॅमिफ्लू) ही गोळी सुरू केली जाते.
  • पुढचे सात दिवस ही गोळी दिली जाते. सगळ्याच रुग्णांना ही गोळी दिली जात आहे.
  • खोकल्यासाठी एक पातळ औषध आणि तापासाठी गोळी दिली जात आहे.
  • लक्षणांनुसार एक प्रतिजैवक औषध दिलं जात आहे.  
  • सध्या रुग्णालयातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना याच औषधांनी उपचार केले जात आहेत. 
  • रुग्णांना प्रथिनं, आवश्यक जीवनसत्व असलेला आहार दिला जात आहे, ज्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होतेय. 

दरम्यान "कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या लोकांवर योग्य ते उपचार सुरु आहेत. तुमची रोग प्रतिकारक क्षमता चांगली असेल तर तुम्हाला कोरोनामुळे काहीही होत नाही, तुम्ही बरे होऊ शकता. त्यामुळे योग्य तो आहार घ्या आणि काळजी घ्या आणि तुमच्यामुळे इतरांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून घरात राहा" असा सल्ला डॉक्टर देत आहेत

how covid 19 patients are treated in hospital now step by step process

लढा कोरोनाशी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.