शिवसेनेच्या 'मशाली'सह कशी लढवली निवडणूक? भुजबळांकडून जुन्या आठवणींना उजाळा

बाळासाहेब ठाकरेंनी मला उमेदवारी दिली आणि इतिहास घडला.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal esakal
Updated on

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर नुकतंच निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मशाल ही निवडणूक निशाणी दिली आहे. पण याच मशाल निशाणीवर छगन भुजबळ हे शिवसेनेचा पहिला आमदार म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीचा किस्सा काय होता त्याचं कथनं भुजबळ यांनी आज आपल्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात केलं. (How election was fought with Shiv Sena Mashal symbol Bhujbal got nostalgic)

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: आपल्या गडगंज संपत्तीबाबत भुजबळांनीच दिली माहिती! पाहा काय म्हणाले?

भुजबळ म्हणाले, सन १९७८ साली महानगरपालिकेची पुन्हा निवडणूक झाली. यामध्ये शिवसेना गट छोटा झाला कारण त्यावेळी केंद्रात जनता पार्टीचं राज्य आलं होतं. पण बाळासाहेबांनी मला नेता केलं, कारण माझं काम या निवडणुकीत चांगलं होतं. दरम्यान, इंदिराजींची हत्या झाली लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार निवडून आले.

Chhagan Bhujbal
Andheri ByElection: ऋतुजा लटकेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा मोठा दिलासा

पुढे दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आली. त्यावेळी शिवसेना पार्टी रजिस्टर नव्हती. त्यामुळं आम्हाला पाहिजे ती निशाणी मिळायची. लोकांना वाटायचं शिवसेनेचा वाघ म्हणजेच त्यांची निशाणी. पण वाघ तिथं नव्हता. पण सोप्यात सोपी कोणती निशाणी घ्यायची असा विचार सुरु असताना मशाल ही निशाणी सुचली. कारण भिंतींवर त्याचं चित्र काढायला ती सोपी होती, प्रचारादरम्यान भिंतीवर मीच ती रेखाटायचो.

Chhagan Bhujbal
Rutuja Latke: ऋतुजा लटकेंवर लाच, भ्रष्टाचाराचे आरोप; मुंबई महापालिकेचं हायकोर्टात उत्तर

आमच्याकडे सांगली विट्याचे सोनं-चांदी घालणारे लोक होते. गोंधळी-दिवट्या घेऊन असलेले हे लोक या मशाली घेऊन रात्रभर प्रचार करायचे. 'भुजबळांना मतं द्या, शिवसेनेला मतं द्या' असा त्यांचा गोंधळ सुरु असायचा. प्रचाराची ही नवी पद्धत शिवसैनिकांनी शोधून काढली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल आला आणि रथीमहारथी पडले आणि एकटा छगन भुजबळ निवडून आला. त्यानंतर ८०-८५ च्या काळात आम्ही शिवेसनेकडून खूप राजकीय लढाया दिल्या. शरद पवारांविरोधातही आम्ही लढलो. निलंगेकर पाटील, शंकरराव चव्हाण यांच्या विरुद्ध लढलो, असा किस्सा यावेळी भुजबळांनी सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.