'18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...

'18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. राज्यात सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. येत्या रविवारी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपेल. अशातच अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत. या टप्प्यात रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई शहरानं प्रामुख्यानं असेल. मुंबई, ठाण्यात निर्बंध कायम ठेवत काही प्रमाणात दिलासा देण्याची योजना आखण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतंय. महाराष्ट्र सरकारनं गुरुवारी मुंबी महानगर क्षेत्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा विचार व्यक्त करण्यात आला आहे. तसंच ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यावर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत एकमत झाले आहे. 

गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या ठिकाणांवर प्रतिबंध वाढविण्यासदंर्भात चर्चा झाली. लॉकडाऊन संदर्भातला प्रस्ताव आता केंद्र सरकारला राज्याकडून पाठवण्यात येणार आहे. मात्र चौथ्या टप्याबाबत केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर राज्याचे धोरण स्पष्ट केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, वसई-विरार या शहरांमधील कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. या शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध अधिक कठोर करावेत, असाच सूर या बैठकीत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या क्षेत्रातील निर्बंध आणखी शिथिल करून दुकाने, कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यावरही बैठकीत एकमत झाल्याचं समजतंय.

मुंबईत असा असेल लॉकडाऊन- 4

मुंबई, ठाणे, विरार- वसई, पालघर या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. मुंबईत धारावी हे कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे. मुंबई, ठाण्यातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्यत्र अशंत: दिलासा द्यावा, अशीच सर्व मंत्र्यांची भूमिका या बैठकीत होती.

मुंबईत लोकल सुरू झाल्या तर परिस्थितीवर नियंत्रण आणणं कठीण होऊन जाईल. मात्र, सरकारी कार्यालयांमध्ये जेवढे लोक येणं आवश्यक आहे किंवा आरोग्य सेवा, पोलिस प्रशासन, महापालिकेचे कर्मचारी यांच्यासाठी लोकल सुरू ठेवताना मर्यादित फेऱ्या चालवाव्यात. ओळखपत्र किंवा विशेष पासशिवाय लोकलमध्ये प्रवेश देऊ नये. या अटीवर त्या सुरू करण्याची शिफारसही राज्यानं केंद्र सरकारला केली असल्याची माहिती मिळाली आहे.

महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

how lockdown four will be read full news report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.