उद्या मुंबईत ताशी ६० ते ७० किमी वेगाने वाहणार वारे

मुंबईत रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज
Heavy rains will increase in Mumbai on Sunday
Heavy rains will increase in Mumbai on Sunday
Updated on

मुंबई: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात (Arabian Sea) ‘तौत्के’ (Tauktae) चक्रीवादळ (Cyclone) निर्माण झालं आहे. हे चक्रीवादळ १८ तारखेला गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. गोवा आणि कोकण किनारपट्टीपासून सध्या हे वादळ साडेतीनशे किलोमीटर अंतरावर आहे. गोवा रत्नागिरी-सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट तर अन्य समुद्र किनार्‍यावर यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. (How Mumbai Prepare to face Tauktae cyclone)

‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेही जोरदार तयारी केली आहे. पालिकेने यंत्रणा सज्ज केली आहे. समुद्र किनाऱ्यावरील वस्त्या निर्मनुष्य करण्याचं काम सुरू आहे.

पालिकेने 384 झाडांची छटणी केली आहे, AMC सोबत मिटिंग झाल्या आहेत. आपण सर्व परीने तयार आहोत. पण या चक्रीवादळाचा तडाखा मुंबईला बसणार नाही. शहरात पाणी घुसू शकते, तिथे पंप ठेवले आहेत. मुंबईतील सहा चौपाट्यांवर जीवरक्षक पथके तैनात केली आहेत.

Heavy rains will increase in Mumbai on Sunday
मुंबईत दोन ते तीन तास पाणी तुंबणारच, महापौरांचं वक्तव्य

विजेच्या तारांचा शॉक लागू नये यासाठी प्रवाह खंडित केलाय. वांद्रे-वरळी सी लिंकही बंद केलाय. फायर ब्रिगेड स्टँडबायवर आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईत उद्या इतका असेल वाऱ्याचा ताशी वेग

'तौत्के' चक्रीवादळाबाबत मुंबई महापालिकेची आढावा बैठक संपली आहे. महापालिका आयुक्त, सर्व सहाययक आयुक्त, NDRF चे वरिष्ठ अधिकारी आणि शहर आणि उपनगर जिल्हा आपतकालिन विभागाचे वरीष्ठ अधिकारी , नौदल अधिकारी बैठकीला हजर होते. मुंबईत आज ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे, तर उद्या ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत.

मुंबईत कोविड सेंटरला पर्यायी विद्युत व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. गरज असेल तर रुग्ण हलवले जातील. Ndrf आणि नेव्ही विभागाकडून गरज लागली तर मदत घेतली जाईल. या विभागाने आम्ही तयार असल्याचं म्हटलं आहे.

Heavy rains will increase in Mumbai on Sunday
‘तौत्के’ चक्रीवादळामुळे दोन राज्यांना पुराचा धोका, जाणून घ्या अपडेट्स

मुंबईत पावासाचा अंदाज

अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या चक्रीवादळामुळे येत्या रविवारी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील सर्व किनाऱ्यांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शनिवारपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात रूपांतर होणार आहे. रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

BMC ICU मधील ३९५ रुग्णांना हलवणार

अरबी समुद्रात (arbian sea) घोंगावत असलेल्या वादळामुळे (cyclone threat) रविवारी मुंबईत वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोविड केंद्राच्या (covid center) अतिदक्षता विभागात असलेल्या 395 रुग्णांचे स्थालांतर करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. तसेच, सर्व रुग्णालयांना जनरेटरची सोय करुन ठेवण्याचे निर्देश अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.