मुंबई : आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात होतेय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी या लसीकरण मोहिमेचं उदघाटन करतील आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात लसीकरण मोहिमेला सुरवात होणार आहे. महाराष्ट्रात देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील लसीकरण मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुंबईतील कूपर रुग्णालयाला थेट मोदींशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान आजपासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी मुंबई कशी सज्ज आहे जाणून घेऊयात...
मुंबईतील एकूण नऊ रुग्णांलयांमध्ये लसीकरण केंद्रांवर ही लस दिली जाणार आहे. मुंबईतील नऊ केंद्रांवर लसीकरणासाठी एकूण ७२ बूथ असणार आहेत. या सर्व लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी पाच बूथसाठी एक डॉक्टर देखील असणार आहेत. एका बुथवर दोन शिफ्टमध्ये दोनशे आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लसीकरणात लस दिली जाणार आहे. मुंबईत दररोज १४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मुंबईतील आरोग्य विभागाची क्षमता आहे.
महत्त्वाची बातमी : आज कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; राज्यात 285 लसीकरण केंद्रांवर तयारी पूर्ण
कोणत्या जिल्ह्याला किती डोस मिळाले :
देशभरात मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. अशात आता मुंबई लसीकरणासाठी पूर्णतः सज्ज झाली आहे.
how mumbai is set to give covid vaccine to mumbaikar a to z information
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.