'ती' एक टॅक्सी 'कोरोना' घेऊन फिरत होती मुंबईच्या रस्त्यांवरून...

'ती' एक टॅक्सी 'कोरोना' घेऊन फिरत होती मुंबईच्या रस्त्यांवरून...
Updated on

मुंबई: नॉवेल कोरोना COVID 19 नावाचं संकट जगभरात थैमान घालतंय. आता भारतातही कोरोनाने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. भारतात नॉवेल कोरोनामुळे ३ लोकांचे प्राण गेले आहेत. तर कालच (दिनांक १७ मार्च) महाराष्ट्रात काल कोरोनामुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

परदेशात प्रवास करून भारतात परतलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होते हे लक्षात आल्यावर शासनाकडून सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. एका ६४ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला कोरोना असल्याचं काही दिवसांपूर्वी चाचणी दरम्यान स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात विलागिकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. 

त्यांनी विमानतळापासून ज्या टॅक्सीमध्ये प्रवास केला होता त्याच टॅक्सीतून आणखी ५ जणांनी प्रवास केला होता. त्यामुळे या सर्व ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. यात त्यांची पत्नी आणि मुलाचाही समावेश आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ४१ रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे ७ रुग्ण आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. राज्य सरकारकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सध्यातरी "मुंबई बंद" करण्याची वेळ आलेली नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारकडून योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.  त्यामुळे आपल्या सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे. कमीत कमी घराच्या बाहेर पडणं सर्वांनाच फायदेशीर ठरेल तसंच वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे असं शासनाकडून सांगण्यात येतंय.

how one taxi spread novel corona virus to any people in maharashtra covid19

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.