मुंबई: पॉर्नोग्राफी रॅकेट (porn racket) प्रकरणात अडकलेल्या पीडित मुलींनी पोलिसांना दिलेल्या जबानीतून नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉकडाउनच्या (lockdown) काळात या मुलीने पैशांचे आमिष दाखवून कशा पद्धतीने भुलवले जायचे. अश्लील कृत्य करण्यासाठी त्यांच्यावर कशी जबरदस्ती (force) केली जायची आणि त्यांनी आक्षेप नोंदवलाच, तर कराराचे उल्लंघन असल्याचे सांगून पोलिसात (police) तक्रार नोंदवण्याची धमकी दिली जायची. दोन महिलांच्या जबानीतून ही माहिती समोर आलीय. मिड डे ने हे वृत्त दिले आहे. (How porn racket running in Mumbai Forced and threatened claim porn case victims dmp82)
लॉकडाउनच्या काळात फारशी ओळख नसलेल्या दोन छोट्या अभिनेत्रींचा काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरु होता. कामाच्या शोधाच्या निमित्ताने त्या आरोपींच्या संपर्कात आल्या. आरोपींनी त्यांना पद्धतशीरपणे पॉर्नच्या रॅकेटमध्ये अडकवलं. गेहना वशिष्ठ, रोवा खान आणि तन्वीर खान या तिन्ही आरोपींनी व्हिडिओमध्ये काम करण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती केली. तिन्ही आरोपी व्हिडिओ बनवून ते अरविंद श्रीवास्तव उर्फ यश ठाकूर आणि राज कुंद्राला विकायचे. त्यानंतर हे व्हिडिओ हॉट हिट, न्युफ्लिक आणि हॉट शॉट या अॅपवर अपलोड केले जायचे.
पॉर्नच्या या रॅकेटमध्ये अडकलेल्या एका अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, ती हिंदी, मराठी आणि भोजपुरी या शॉर्ट फिल्मसमध्ये काम करायची. २०१८ मध्ये ती रौनक नावाच्या व्यक्तीला भेटली. ४ फेब्रुवारीला ते मालाडमध्ये भेटले. त्यावेळी रोवा सुद्धा तेथे आला होता. महिलेची रोवा बरोबर तो निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख करुन देण्यात आली. त्यानंतर रोवाच्या कारमधून ते मड येथे गेले. 'सिंगल मदर' म्हणून तिला स्क्रिप्ट देण्यात आली. त्यानंतर महिलेला मेकअप रुममध्ये नेण्यात आले.
महिला तयार झाल्यानंतर तिला ती 'सिंगल मदर' च्या रोलसाठी फिट नसल्याचे सांगण्यात आले. ती खूपच बारीक आहे, असे तिला सांगितले. त्यानंतर तिला 'बर्तनवाली'चे स्क्रिप्ट देण्यात आले. महिलेने स्क्रिप्ट वाचून काम करण्यास नकार दिला. पैसे हवे असतील, तर तुला काम करावे लागेल. ही फिल्म कुठल्याही चॅनलवर प्रसारीत होणार नाही, असे रोवाने तिला सांगितले. "ही फिल्म पाहण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील. आम्ही तुझे नाव आणि लूक बदललाय. कोणीही तुला ओळखणार नाही" असे रोवाने या महिलेला सांगितले.
'बर्तनवाली' साठी महिलेला काही बोल्ड सीन चित्रीत करावे लागले. जे तिला मान्य नव्हते. एक सीन झाल्यानंतर दुसऱ्या सीनमध्ये महिलेला न्यूड होण्यास सांगितले. पण तिने नकार दिला. त्यावेळी रोवाने तिला "करार मोडलास तर तक्रार दाखल करेन, म्हणून धमकी दिली. शूटिंगसाठी खर्च केलेले पैसे तुझ्याकडून वसूल करीन असं धमकावलं." "त्यानंतर पीडित महिला चित्रीकरणासाठी तयार झाली. चित्रीकरण सुरु असताना, साध्या वेशात काही महिला आणि पुरुष तिथे दाखल झाले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगितल्यानंतर चित्रीकरण थांबवण्यात आले" असे महिलेने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.
राज कुंद्राच्या अडचणीत वाढ
दरम्यान राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईच्या मालवणी पोलिस ठाण्यात राज कुंद्रा आणि मॉडेल गेहना विशिष्ठ आणि इतर तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली अश्लिल व्हिडिओ बनवून राज कुंद्राच्या कंपनीने ते हॉटशॉट अॅपवर अपलोड केले. 26 जुलै रोजी या प्रकरणात पीडितेने पोलिसात जबाब नोंदवला होता. या प्रकरणी हा नवा गुन्हा नोंदवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.