मुंबई : महाराष्ट्रात परभणीत तब्बल ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झालाय. देशभरात एकीकडे कोरोनाचं संकट तर आहेच. सोबतच आता बर्ड फ्लू डोकं वर काढतोय. अशात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येतंय. हिमाचल, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात देखील बर्ड फ्लू पसरला आहे. महाराष्ट्रातील बर्ड फ्लू मुळे झालेल्या ८०० कोंबड्यांमुळे आता महाराष्ट्रात आपल्या सर्वांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
धक्कादायक : Bird Flu हा आजार पक्षांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरू शकतो. WHO च्या एका अहवालानुसार हा रोग इन्फ्लुएंजा टाइप H5N1 व्हायरसमुळं पसरतो. धक्कादायक बाब म्हणजे या आजाराचा मृत्युदर हा तब्बल साठ टक्के इतका जास्त आहे. पक्षांची विष्ठा किंवा लाळेमधून हा व्हायरस तब्बल दहा दिवसांपर्यंत पसरू शकतो.
कशी घ्याल काळजी :
चिकन आणि अंडी खाताना काय काळजी घ्याल :
सरकारकडून चिकन आणि अंडी न खाण्याबाबत अधिकृत काहीही माहिती आलेली नाही. त्यामुळे सर्वात आधी अवफवांवर विश्वास ठेवणे बंद करा. चिकन आणि अंडी खाताना ते योग्य प्रकारे शिजवून खा. केवळ चिकन आणि अंडीच नाही तर सर्व मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवून खाणे गरजेचे आहे. चिकनला किमान 100 डिग्री तापमानावर शिजवा आणि त्यानंतरच त्याचे सेवन करा.
how to take care during bird flu and what precautions are necessary amid bird flu
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.