लॉक डाऊनमुळे घरातली भांडणं, ताण तणाव वाढतोय ? जाणून घ्या कारणं ...   

लॉक डाऊनमुळे घरातली भांडणं, ताण तणाव वाढतोय ? जाणून घ्या कारणं ...   
Updated on

मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या संपूर्ण जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. भारतात देखील आता तिसरा लॉक डाऊन जारी करण्यात आलाय. त्यामुळे बहुतांश लोकं आपल्याच घरीच आहेत आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. मात्र यामुळे जगभरातून गृहकलह आणि घटस्फोटाचा घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गृहकलहांच्या तक्रारींमध्ये तब्बल दुपटीनं वाढ झाली आहे. खरं म्हणजे लॉकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबानं एकत्रितपणे राहून वेळ घालवणं अपेक्षित होतं. मात्र गृहकलहांच्या या तक्रारी दुप्पट  होणं हि चिंतेची बाब आहे.

गृहकलह म्हणजेच यात शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टी येतात. अनेकदा पतीकडून पत्नीची मारहाण केली जाते, सासू-सासऱ्यांकडून सुनेचा मानसिक छळ केला जातो किंवा पती-पत्नीमध्ये शाब्दिक भांडण होतं. मात्र या गोष्टी विकोपाला जातात तेव्हा तक्रार नोंदवण्यात येते. या गृहकलहांमुळे फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही त्रास होतो.

असे थांबवा गृहकलह:

  • जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकमेकांवर आरडाओरड करून बोलू नका. 
  • कुटुंबातल्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
  • घरात देव देवतांची पूजा करून वातावरण मंगलमय ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • घरच्या घरी मेडिटेशन करा. ताण घेऊ नका.
  • आपली चिंता घरात बोलून दाखवा, घरात बोलता येत नसे तर मित्रांशी फोनवरून  साधा. 

गृहकलह किंवा हिंसा शहरी भागात आणि ग्रामीण भागात समान प्रमाणात होत असते. ग्रामीण भागात गृहकलहांदरम्यान हिंसाचार अधिक प्रमाणात केला जातो. तर शहरी भागात मानसिक छळ जास्त प्रमाणात केला जातो. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये गृहकलहांच्या प्रमाणाला शैक्षणिक पात्रता आणि आजूबाजूचं वातावरण या गोष्टीही कारणीभूत असतात.

लॉकडाऊनमध्ये का वाढवतायेत गृहकलहांच्या तक्रारी:

साधारणतः घरची आर्थिक बाजू मजबूत ठेवण्याचं काम पुरुषांचं असतं आणि महिलाही त्यांना हातभार लावत असतात. मात्र लॉक डाऊनमुळे महिला आणि पुरुष दोघेही घरीच आहेत. त्यात काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची वेतन कपात होणार आहे. त्यामुळे महिन्याच्या आर्थिक नियोजनाची घडी व्यवस्थित बसवणं कुटुंबातल्या पुरुषांना शक्य होतं नाहीये. यामुळे वादाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आर्थिक अडचणी असल्यामुळे कुटुंबात मानसिक तणावाचं निर्माण झालं आहे. हेच गृहकलह वाढण्याचं मुख्य कारण आहे. वेतन कपातीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे मानसिक तणाव निर्माण होत आहे त्यामुळे पुरुषांकडून महिलांना मारहाण होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.  

अधिक प्रमाणात थकवा आल्यामुळेही होतात गृहकलह:

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व घरकाम  करणाऱ्या महिला सुट्टीवर आहेत. घरी असलेल्या महिलांनाच आता घरकाम करावं लागत आहे. त्यामुळे महिलांना प्रचंड थकवा जाणवतोय. पुरुष सध्या घरी असूनही कुठलंही काम करत नाहीये तसंच महिलांना त्यांच्या कामात मदतही करत नाहीयेत. याचाही मानसिक तणाव महिलांना येतोय. मुलांच्या आणि इतर कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात महिलांना प्रचंड थकवा येतो आहे. पुरेसा आराम न मिळाल्यामुळे त्यांना मानसिक थकवा येतोय. यामुळे गृहकलह निर्माण होऊ शकतात. दरम्यान काही महिलांना घरकाम करून वर्क फ्रॉम होमही करावं लागतंय त्यामुळे त्यांच्या तणावात दुपटीनं वाढ होत आहे.

how too keep positive atmosphere in home during lockdown period

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.