यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करावा ? काय बदल होऊ शकतो ? काय म्हणतायत मोठी मंडळं 

यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करावा ? काय बदल होऊ शकतो ? काय म्हणतायत मोठी मंडळं 
Updated on

मुंबई : कोरोना प्रभाव वाढत असल्याने गणेशोत्सवावर अनिश्चितेचे सावट निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रभाव  गणेशोत्सवापर्यंत असाच राहिला तर गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सामाजिक भान जपत साजरा करण्यात येणार आहे. याचाच परिणाम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीच्या मूर्ती उंची कमी होण्याची शक्यता आहे. आता पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्तीबाबत निर्णय घेतला नाही. त्यासाठी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाची प्रतिक्षा करण्यात येत आहे. त्यानंतर मूर्तीकार व सार्वजनिक मंडळ मूर्तिबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. मूर्ती उंची कमी झाली तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होईल.

बृहन्मुंबई मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीबाबत अजून कोणताच निर्णय आम्ही घेतला नाही. तुर्तास आम्ही केवळ घरगुती गणपतीच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. राज्य सरकार, मुंबई महापालिका, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची संयुक्तरित्या बैठक घेऊन सार्वजनिक मूर्तीबाबत निर्णय  होईल. त्यानंतर आम्ही भूमिका स्पष्ट करू.

बैठकीसाठी मुख्यमंत्र्याना पत्रही दिले आहे, असे तोंडवळकर यांनी सांगितले. आता शाडूच्या मूर्ती बनवण्याच्या कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी गुजरात येथून शाडू मातीची वाहतूक करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. प्रत्येक मूर्तिकारांना घरपोच माती वितरित केली जाणार आहे. तसेच मूर्तीची उंची अडीच फूटापर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे परंतु मागणीच्या तुलनेत आम्ही केवळ 60 टक्के मूर्ती घडवू शकतो. . उर्वरित मागणीणीचे काय करायचे हा प्रश्नच आहे, असे तोंडवळकर म्हणाले. ग्राहकांकडून शाडूच्या मातीती मूर्तीची मागणी जास्त आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेब्रुवारीमध्ये एका सुनवाणीत पीओपी मूर्ती बंदी करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे घरगुती गणपतीची मूर्तीमध्ये या वर्षी शाडूत्या मूर्ती तयार करण्यावर मूर्तिकारांनी भर दिला आहे, असे राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष वसंत राजे यांनी दिली. 

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणेशोत्स मंडळांसाठी कोरोना प्रभाव लक्षात घेऊन नियमावाली तयारी केली. तसेच सूचनेबाबत आजपासून समितीचे टि्वटर हॅडल सुरू केले आहे. या नियमावली नुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करावा. त्यामध्ये गणेश मूर्तीची उंची मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे, असे समन्वय समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी सांगितले. 

ही आहे नियमावली : 

  • वर्गणी - मुंबईतील मोठ्या मंडळांनी ( आर्थिकदृष्ट्या सक्षम)  विभागीय वर्गणी घेऊ नये. मात्र केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये याकरिता या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करणे. 
  • श्रीमुर्ती - कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरावा . शक्य असल्यास शाडू मूर्तीस प्राधान्य द्यावे.
  • मंडप/रोषणाई- मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा . या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.
  • आगमन - श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क व सॅनिटीझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे .
  • श्रीदर्शन- मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस ( भटजी कार्यकते इ) हात - पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल अशी व्यवस्था करणे . 
  • कार्यक्रम - गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी यंदाच्या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर , रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे . 
  • विसर्जन- आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच श्रींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी

मूर्तिबाबत अजून कोणताही निर्णय़ झाला नाही. परंतु गणेशोत्सव साधा पद्धतीने केला जाईल. खर्चात कपात करण्यात येणार आहे. रोषणाई, डेकोरेशनवर खर्च कमी करण्यात येईल. समन्वय समितीच्या सुचनेप्रमाणे मंडळ सहकार्य करेल असं चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव वासुदेव सावंत उणी सांगितलं. 

याचसोबत लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव स्वप्नील परब म्हणतात, या वर्षी मंडळाचा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर राहील. तसेच मंडळ वर्गणीदारांकडून वर्गणी घेणार नाही. तसेच रोषणाई व डेकोरेशन याच्यावरील खर्च कमी करण्यात येणार आहे. हा निर्णय मंडळाची ऑनलाईन झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

how this years ganeshotsav will be celebrated see what representatives of big mandals are saying

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.