गेल्या शनिवारी झालेल्या १२वीच्या रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालाडमधील खासगी क्लासेसमार्फत ही घटना झाल्याचं समोर आलंय. मुकेश यादव असं या खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. (HSC Board Chemistry Paper Leaked)
कोचिंग क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना हा पेपर आधीच मिळाला होता. त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शनिवारी सकाळई १०.३० वाजता सुरू होणार असलेला पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झाला. विले पार्ले पोलिसांनी याप्रकरणी यादव नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय.
विले पार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी उशीराने आल्याने तिच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची चौकशीदेखील केली. पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याची चौकशी सुरू आहे. टीईटी, लष्कर भरतीपासून परिक्षांमध्ये घोटाळे झाल्यानंतर आता पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, याचीही माहिती घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप HSC बोर्डाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.