कोविडकाळात शेकडो कोटींची लूट; ठाकरे-पवारांवर सोमय्यांचे नवे आरोप

"घोटाळेबाज शिवसेनेला मुंबई महापालिका म्हणजे लुटण्याचं साधन आहे"
Somailya_Thackeray_Pawar
Somailya_Thackeray_Pawar
Updated on

मुंबई महापालिकेत (BMC) सत्तेत असलेल्या शिवसेनेनं (ShivSena) कोविड काळात शेकडो कोटींची लूट आणि कमाई केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. घोटाळेबाज शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे लुटण्याचं साधन आहे. यामध्ये महापौर असोत, स्थायी समिती अध्यक्ष असोत किंवा पक्षाचे दिग्गज नेते असोत सर्वांचाच सहभाग आहे. कोविडमध्ये यांनी महापालिकेची शेकडो कोटींची लूट केली आणि स्वतःची कमाई केली, असा आरोप पत्रकार परिषद घेऊन सोमैय्या यांनी केला आहे. तसेच या लुटीचं ट्रेनिंग देणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. (Hundreds of crores looted from Shiv Sena during Covid period Kirit Somaiya)

Somailya_Thackeray_Pawar
ओमिक्रॉनची भीती, चीनमध्ये लाखो नागरिक घरात बंदीस्त

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी आपली पत्नी आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी पैसे लुटले आहेत. हे पैसे लुटायचे आणि कसे पास करायचे यासाठी पवार-ठाकरे यांनी मंत्रालयात स्पेशल कार्यशाळा आयोजित केल्याचं दिसतंय. त्यामुळेच अनिल देशमुख (Anil Deshmukh), अनिल परब, भावना गवळी आणि आता यशवंत जाधव हे सगळेच अडकलेले दिसतायत. यशवंत जाधवांनी १५ कोटी रुपये उदय शंकर महावार आणि पीयूष जैन या एजंटला दिले. यातील महावार हा कुप्रसिद्ध मनी लॉंड्रिंग करणारा एजंट आहे. यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स प्रा. लि. या बोगस कंपनीच्या खात्यात १५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. या कंपनीचे एक रुपयाचे शेअर्स अॅपल कॉमर्स प्रा. लि., गुडबॉन मर्चंटाईल प्रा. लि., फुलवारी ट्रेडिंग प्रा. लि., स्वर्णभूमी वाणिज्य प्रा. लि., निश्चया ट्रेडिंग प्रा. लि., अष्टविनायक ट्रेडिंग प्रा. लि. या पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दरानं विकत घेतले. यामध्ये प्रधान डिलर्ससह त्याचे शेअर्स घेणाऱ्या पाच कंपन्याही बोगस आहेत, असा दावा सोमैय्या यांनी केला आहे.

Somailya_Thackeray_Pawar
तरुणाईत वाढतेय शेअर बाजाराचे आकर्षण

दरम्यान, हे १५ कोटी रुपये प्रधान डिलर्सच्या खात्यातून यशवंत जाधव यांच्या खात्यात जमा झाले. यापैकी यशवंत जाधवांच्या खात्यात दोन कोटी रुपये, यामिनी जाधवांच्या खात्यात दोन कोटी, निखिल यशवंत जाधव यांच्या खात्यात ५० लाख, यतीन यशवंत जाधव यांच्या खात्यात ५० लाख, निखिल-यशवंत यांच्या कंपनीच्या खात्यात ३ कोटी रुपये, त्याच्या दुसऱ्या कंपनीत २ कोटी रुपये, त्यांच्या नातेवाईकांच्या कंपनीत ५ कोटी रुपये जमा झाले. यानंतर यशवंत जाधवांनी हे पैसे युएईला पाठवले. उद्धव ठाकरेंना मानलं पाहिजे कारण हा नवीन प्रकार शिवसेनेत सुरु झाला आहे. माफिया कॉन्ट्रॅक्टरकडून त्यांना पैसे घेत आहेत. यशवंत जाधवांनी १५ कोटी रुपये दिले हे तपासात सिद्ध होत असल्याचा दावाही यावेळी सोमैय्या यांनी केला.

"महापौर पेडणेकरांचा कोविड घोटाळ्यात सहभाग"

स्थायी समिती अध्यक्षांबरोबरच महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील घोटाळा केल्याचा दावा यावेळी सोमैय्या यांनी केला. डिपार्टमेंट ऑफ कंपनी एफएसमध्ये पेडणेकर यांनी डॉक्युमेंट फाईल केले आहेत. यामध्ये पेडणेकर यांच्या मालकीच्या एका कंपनीनं मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अखत्यारितील कोविड सेंटर चालवण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिलं. जी कंपनी स्वतः पेडणेकर यांचीच आहे.

आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावं - सोमैय्या

कोविड काळात तीन वर्षात महापौरांच्या कंपनीचे टर्नओव्हर सुमारे १ कोटी रुपये राहिला कसा? कोविड काळात मुंबई महापालिकेचं महापौरांच्या कंपनीला किती काम देण्यात आलं? आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावं की, कोणत्याही प्रकारच्या निविदा आणि निकष न लावता वरळीचे पालकमंत्री असताना महापौरांच्या कंपनीला कंत्राट कसं दिलं? असे अनेक सवाल यावेळी सोमैय्या यांनी केले आहेत. तसेच जे कोविड सेंटर सुरुच झाले नाहीत त्यांनाही कोट्यवधींचे पेमेंट झाले, असा आरोपही यावेळी सोमैय्या यांनी केला. कोविडच्या काळातील या सर्व कंत्राटांची विशेष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सोमैय्यांनी यावेळी केली. तसेच कोविड हे लोकांना लुटण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी आहे का? असा सवाल करत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची तातडीने हाकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.