मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत विचित्र प्रकार घडला आहे. या पोलीस महिलेत्या पतीने व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपल्याच पत्नीचे अश्लील आणि नग्न फोटो पोस्ट करून तिची बदनामी केल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीला अटक केली आहे. (Marine Drive Police Arrested Huband after sharing nudes of wife)
मरिन ड्राईव्ह पोलिसांनी पुण्यातील चाकण भागात आरोपीला अटक केली. भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार बदनामी करणे, महिलेचा विनयभंग करणे, महिलेच्या जाहीरपणे अपमान करणे या कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Mumbai Crime News)
2017 मध्ये या दोघांचे लग्न झाले असून जोडप्याला एक मुलगी आहे. लग्नानंतर महिन्याभरातच संबंधित महिला फोर्समध्ये पुन्हा रुजू होण्यासाठी मुंबईला परतल्या. तर पती पुण्यातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. महिन्यातून काही दिवस पत्नी तिच्या पतीला भेटायला जायची. तो तिला तिचे सतत नग्न छायाचित्र पाठवण्याचा आग्रह धरायचा. तिने सुरुवातीला नकार दिल्याने वाद निर्माण झाला. मात्र हे टाळण्यासाठी पत्नीने तिला व्हॉट्सअॅपवर नग्न फोटो पाठवायला सुरुवात केली.
ऑगस्ट 2021 मध्ये तिने पतीच्या इच्छेविरुद्ध महिलेने मुलीला पुण्याहून मुंबईत आणलं होतं. 11 मार्चला ड्युटीवर असताना महिलेला धक्कादायक माहिती मिळाली. पतीने व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला. यावर सर्व नातेवाईकांना अॅड केलं. आणि तिचे सर्व फोटो पोस्ट केले. एवढ्यावर न थांबता त्याने सोशल मीडियावरही काही फोटो प्रसिद्ध केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यानंतर पत्नीचे संबंध तिच्या आधीच्या प्रियकरासोबत आहेत, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या दोघांचे काही चॅट्स देखील उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.