Viral Audio Clip: 'मी मुस्लिम आणि महाराष्ट्रीयन लोकांना व्यवसाय देत नाही,' ऑडिओ व्हायरल; यूपीच्या टीसीला रेल्वेचा दणका

Viral Audio Clip Of TC: हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तातडीने दखल घेतली. मनसे सदस्यांनी पांडे यांना गाठत कठोर इशारा दिला.
Viral audio clip
Viral audio clipEsakal
Updated on

'I don't give business to Muslims and Maharashtrians' viral audio clip:

पश्चिम रेल्वेचे तिकीट कलेक्टर (TC) आशिष पांडे यांनी महाराष्ट्रातील लोक आणि मुस्लिम समाजाविरुद्ध भेदभाव करणारे वक्तव्य केल्याने मुंबईत मोठा वाद निर्माण झाला आहे.

मूळचे उत्तर प्रदेशातील परंतु मुंबईतील विक्रोळी येथे राहणारे पांडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते "मराठी किंवा मुस्लिम व्यवसायिकांकडून खरेदी करणार नाही तसेच मराठी किंवा मुस्लिम चालक चालवलेल्या ऑटो-रिक्षा वापरणार नाहीत," असे म्हणताना ऐकू येत होते.

टीसीच्या या कथित विधानांची ऑडिओ क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी एका सोशल मीडिया युजरने पोस्ट केली होती, जी वेगाने व्हायरल झाली. ज्यामुळे राज्यभरात संताप निर्माण झाला होता.

"मी मुस्लिम आणि महाराष्ट्रीयनांना व्यवसाय देत नाही. मी मुस्लिम आणि महाराष्ट्रीयन लोकांच्या गाड्यांमध्ये बसत नाही," असे या ऑडिओमध्ये कथितपणे पांडे यांनी म्हटले आहे.

या घटनेमुळे महाराष्ट्रात विशेषत: स्थलांतरित कामगार आणि परराज्यातून आलेल्यांच्या विरोधात स्थानिक लोकांचा संताप वाढला आहे.

दरम्यान या ऑडिओ क्लिपवर विविध स्तरातून तीव्र टीका होत आहे, अनेकांनी पांडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तातडीने दखल घेतली. मनसे सदस्यांनी पांडे यांना गाठत त्यांना चांगलाच चोप देत कठोर इशारा दिला.

Viral audio clip
Viral Video : ‘असलं’ कृत्य पाहून भडकली नवरी; लग्नाच्या स्टेजवरच नवऱ्याला मारली कानाखाली, पहा व्हिडिओ 

दरम्यान या प्रकरणी पश्चिम रेल्वेने दखल घेत निवेदन जारी केले आहे. "आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत आहोत. धार्मिक समुदाय आणि महाराष्ट्रीयन लोक यांच्याबद्दल अशा प्रकारच्या प्रतिकूल टिप्पणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत," असे पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी आपल्या निवदनात म्हटले आहे.

Viral audio clip
Mental Health: ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? वाचा काय आहे व्हायरल सत्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.