राज ठाकरे इतके बदलतील असं मला वाटत नाही - बाळासाहेब थोरात

'निमंत्रणाची मी स्वीकार केला आणि आज चहा पिण्यासाठी आलो होतो.'
राज ठाकरे इतके बदलतील असं मला वाटत नाही - बाळासाहेब थोरात
Updated on

- रश्मी पुराणिक

मुंबई: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यावरुन विविध राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या बैठकीकडे पुढच्यावर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC) दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. भाजप-मनसे एकत्र येणार अशी चर्चा आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "मनसे-भाजप युतीचा कसलाही प्रस्ताव नाही. नाशिक दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंशी अनपेक्षित भेट झाली होती. त्यांनी निवासस्थानी घेऊन भेटण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट होती."

राज ठाकरे इतके बदलतील असं मला वाटत नाही - बाळासाहेब थोरात
चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना ओपन चॅलेंज

चंद्रकांत पाटील म्हणाले की, "नाशिकला असताना माझी आणि राज ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी मला घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याचा स्वीकार मी केला आणि आज चहा पिण्यासाठी आलो होतो. राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही."

राज ठाकरे इतके बदलतील असं मला वाटत नाही - बाळासाहेब थोरात
'एकदिवस लोकलने आणि दुसऱ्यादिवशी भारी गाडीने फिरायचं हे राजकारण झालं'

काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर भाष्य केले आहे. "राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत जी भाषण केली, त्यानंतर ते इतके बदलतील अस मला वाटत नाही" असं थोरात म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.