मविआ सरकारमध्ये मी CM होणार होतो पण, अजित पवार...; एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत भाषण केलं.
Eknath Shinde
Eknath Shinde
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते पण त्यांना ही संधी मिळू शकली नाही. त्याऐवजी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. याबाबतचा खुलासा शिंदे यांनी आज विधानसभेत बोलताना केला. (I was going to be CM in MVA govt Eknath Shinde revealed in VidhanSabha)

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत भाषण केलं. यावेळी ते म्हणाले, "महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला मीच संभाव्य मुख्यमंत्री होतो. पण नंतर अजित पवार किंवा इतर कोणीतरी म्हटलं की मला मुख्यमंत्री बनवू नये. त्यावेळी मी म्हटलं मला काहीही अडचण नाही, उलट मी उद्धव ठाकरेंना म्हटलं की त्यांनी पुढे यावं मी तुमच्यासोबत आहे. माझी मुख्यमंत्रीपदावर कधीही नजर नव्हती"

Eknath Shinde
गोव्याचा विमान प्रवास डोंबिवलीच्या कॅब प्रवासापेक्षाही स्वस्त ! यजुरचं ट्विट चर्चेत

आम्ही शिवसैनिक आहोत आणि आम्ही नेमहीच बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक राहू. मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायंच आहे की, तुम्ही सगळे त्यांच्यासोबत गेले आहात ज्यांनी बाळासाहेबांना ६ वर्षांसाठी मतदानावर बंदी आणली होती, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदारांना टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.