चर्चगेट येथील सनदी अधिकाऱ्यांची इमारत सील
मुंबई : कोरोनाचा विळखा आता सनदी अधिकार्यांपर्यंत पोहोचला आहे. सनदी अधिकार्यांचे निवासस्थान असलेली यशोधन इमारतीचा एक मजला महापालिकेने सील केला आहे. सील केलेल्या इमारतीच्या यादीत या इमारतीचेही नाव आहे.
पोलिस, पालिका कर्मचारी, कामगारांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, आतापर्यंत वरिष्ठ सनदी अधिकार्यापर्यंत कोरोना पोहचला नव्हता. मात्र, महापालिकेने आज जाहीर केलेल्या सील इमारतीच्या यादीत चर्चगेट येथील यशोधन इमारतीचाही समावेश आहे. या इमारतीत राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी राहातात. या इमारतीचा एक मजला सील करण्यात आल्याची माहिती पुढे आली. मात्र, नक्की कोणता मजला सील करण्यात आला याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
महापालिका मुख्यालयात आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह आठ सनदी अधिकार्यांचा वावर आहे. तर मुख्यालयातील 20 कर्मचारी आणि अधिकार्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.या इमारतीत सचिव, प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव यांच्यासह वरीष्ठ सनदी अधिकारी राहतात.
ias officers building Sealed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.