1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी अमोल कीर्तीकरांच्या प्रचार रॅलीमध्ये? बाबा मूसा कोण आहे?

Amol Kirtikar News: पश्चिम उत्तर मुंबईचे मविआचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारावेळी इब्राहिम मूसा उपस्थिती होता असा दावा करण्यात आलाय.
Amol Kirtikar
Amol Kirtikar
Updated on

मुंबई- १९९३ मध्ये मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी इब्राहिम मूसा हा वायव्य मुंबईतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये सहभागी होता असा दावा करण्यात आला आहे. पश्चिम उत्तर मुंबईचे मविआचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारावेळी इब्राहिम मूसा उपस्थिती होता असा दावा करण्यात आलाय. यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. अमोल कीर्तीकर बुधवारी रॅली घेत होते. यावेळी मूसा त्यांच्या प्रचारात सहभागी होता असा दावा भाजपने केला आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी या मुद्द्यावरुन अमोल कीर्तीकर आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. अंधेरी वेस्ट याठिकाणी प्रचार करताना कीर्तीकरांच्या सभेत मूसा उपस्थित होता असा दावा करण्यात आलाय.

Amol Kirtikar
Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

भाजप नेत्याने म्हटलं की, 'अंधेरी वेस्टमध्ये १९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी बाबा मूसा मविआचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हे स्पष्ट आहे की हा संघर्ष राष्ट्रीय शक्ती आणि तुकडे-तुकडे गँग यांच्यातील नाही, तर भारत आणि पाकिस्तानमधील आहे. मुंबईच्या हत्यारांसोबत काँग्रेसचा हात आहे. मुंबईकरांना जाळू पाहणाऱ्या या लोकांना ओळखलं पाहिजे.'

हिंदुह्रदयसम्राटांनी ९३ च्या स्फोटांनंतर मुंबईला संरक्षण देण्यासाठी जीवाचं रान केलं होतं आणि तुम्ही मशाल दहशतवाद्यांच्या हाती देऊन मुंबईच नाही तर देश जाळायलं निघालात का? दहशतवाद्यांचा पुळका असलेल्या काँग्रेसनं त्यांची निष्ठा कोणाच्या पायाशी, हे दाखवून दिलचं होतं. उबाठा गट देखील काँग्रेसच्याच रंगात रंगून गेला हे या घटनेवरून सिद्ध झालं, असं म्हणत भाजपने टीका केलीये

Amol Kirtikar
Nashik Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात ‘ऑपरेशन नाथ’; CM शिंदे यांनी केले सुतोवाच

इब्राहिम मूसा कोण आहे?

मूसा हा बाबा चव्हाण म्हणून देखील ओळखला जातो. तो १९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणातील दोषी आहे. बॉम्बस्फोटाआधी अभिनेता संजय दत्तच्या घरी शस्त्र नेण्याबाबत तो आरोपी आहे. खटल्यानुसार, मूसा, अबू सालेम आणि इतर काहीजण १५ जानेवारी , १९९३ रोजी दत्तच्या घरी गेले होते. शस्त्र पुढच्या दिवशी पोहोचतील हे सांगण्यासाठी ते दत्तच्या घरी गेले होते. साखळी बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ७०० जण जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.