मुंबईची प्रिती कामत सीए इंटरमीडिएटमध्ये देशात प्रथम

ICAI
ICAIsakal media
Updated on

मुंबई : द चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI) जुलैमध्ये या परीक्षा घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल अभ्यासक्रमातील इंटरमिडिएट (आयपीसी), इंटरमिडिएट (नवीन अभ्यासक्रम) परीक्षांचा निकाल (exam result) जाहीर करण्यात आला. आयपीसी परीक्षेत मुंबईच्या प्रीती कामतने (Preeti kamat) देशात पहिला क्रमांक मिळवला.

ICAI
मुंबईतील कोरोनासाठीचे 91 टक्के बेड्स रिक्त; आयसीयू आणि व्हेंटिलेटरही रिकामे

आयपीसी परीक्षा देशभरातील ५९८ केद्रांवर घेण्यात आली. त्यात केवळ पहिल्या गटाची परीक्षा दिलेल्या ८ हजार ८७३ विद्याथ्र्यांपैकी ३८५ विद्यार्थी (४.३४ टक्के ) विद्यार्थी उत्तीर्ण झाले, केवळ दुसºया गटाची परीक्षा दिलेल्या २६ हजार ४१३ विद्याथ्र्यांपैकी ७ हजार ९५७ विद्यार्थी (३०.१३ टक्के ) उत्तीर्ण झाले. तर दोन्ही गटांची परीक्षा दिलेल्या ३ हजार ७९८ विद्याथ्र्यांपैकी २५ विद्यार्थी (०.६६ टक्के ) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंटरमिडिएट (नवीन अभ्यासक्रम) परीक्षेत नवी दिल्लीच्या अर्जून मेहराने देशात पहिला, महिन नाईमने दुसरा आणि बंगळुरूच्या सुदीप्ता बेन्याने तिसरा क्रमांक मिळवला. देशभरातील ७४२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

दोन्ही गटात १०.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सीएच्या या परीक्षेतील केवळ पहिल्या गटाची परीक्षा दिलेल्या ६० हजार ३३५ विद्याथ्र्यांपैकी १७ हजार ५६३ विद्यार्थी (२९.११ टक्के ) विद्यार्थी उत्तीर्ण झाले, केवळ दुसऱ्या गटाची परीक्षा दिलेल्या ४५ हजार ४२३ विद्याथ्र्यांपैकी १० हजार ८२ (२२.२ टक्के ) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही गटांची परीक्षा दिलेल्या २० हजार ६६८ विद्याथ्र्यांपैकी २ हजार १६९ (१०.४९ टक्के ) विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती आयसीएआयतर्फे देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.