कोरोनासह इतर आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा होणार अभ्यास- ICMR

अभ्यासाची तयारी सुरू, मुंबईचाही समावेश
Corona
Corona sakal media
Updated on

मुंबई : मुंबईसह देशभरात कोरोना आणि त्या व्यतिरिक्त झालेल्या मृत्यूंचा (Corona Deaths) अभ्यास केला जाणार आहे. त्याबाबतची तयारी सुरू झाली आहे. आयसीएमआरची (ICMR) याबाबतची एक बंगळूरुला नॅशनल काऊन्सिल आहे. संपूर्ण भारतातून (Whole India Study) हा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी काही शहरांची निवड केली जाईल. त्यात मुंबईचा ही समावेश असणार आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील मृत्यू (Corona Second Wave deaths)आणि त्या आधीच्या मृत्यूंची तूलनाशिवाय, कोरोनामुळे झालेले मृत्यू आणि एकूण झालेल्या मृत्यूंमध्ये काही तफावत आहे का? याबाबतही अभ्यास केला जाणार आहे. (ICMR prepares For investigation of all deaths in Corona )

मुंबईत 2019 मध्ये एकूण 90 हजार मृत्यू झाले होते. तर, कोरोना काळात 2020 मध्ये 1 लाख 11 हजार मृत्यू झाले आहेत. त्यानुसार, 21 हजार मृत्यूंची भर पडली. त्यातील कोरोनामुळे जवळपास 10 ते 12 हजार मृत्यू होते. उर्वरित 8 हजार मृत्यू कोणत्या कारणामुळे झाले? घरीच आजारी होते म्हणून ते वाढलेले दिसतात का? ही माहिती त्यातुन शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. साधारणपणे दरवर्षी 3 टक्क्यांनी मृत्यूदर वाढतो.

Corona
मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होणार ?

मुंबईत मृत्यूचा योग्य रेकॉर्ड

मुंबईत मृत्यूचा रेकॉर्ड योग्य पद्धतीने ठेवला जात आहे. पण, मुंबईसह इतर शहरांमध्येही मृत्यू वाढल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे, कोणत्या कारणामुळे मृत्यूंची संख्या वाढली आहे? याचा तपास होणे आवश्यक आहे.

कसा होणार अभ्यास?

या अभ्यासात मृत्यू होण्यामागे नेमकी कोणकोणती कारणे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच्या पॅटर्नमध्ये नेमके तरुण, ज्येष्ठांचा मृत्यू झाला का? ह्रदयविकार वाढले की इतर आजार वाढले ? यासाठी हा अभ्यास केला जाणार आहे.

आयसीएमआरकडून मृत्यू वाढलेल्याचा अभ्यास केला जाणार आहे. मृत्यूंचाआ विश्लेषण होणे गरजेचे आहे कारण याचा फायदा पुढे जाऊन होणार आहे. कोरोना काळात कोरोना व्यतिरिक्त मृत्यू वाढले आहेत का? त्यानुसार आरोग्य व्यवस्था बळकट करायला हवी का? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आता मृत्यूदर 1.6 वरुन 2.1 वर पोहोचला आहे. मृत्यू लपवले नाही तरी ते रेकॉर्ड होत नाहीत. त्यामुळे, हा सर्व बाजूंनी अभ्यास केला जाणार आहे.

डाॅ. अविनाश सुपे, अध्यक्ष, कोरोना  मृत्यू विश्लेषण समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.