लवकरच आयसीएसईचा ऑनलाईन निकाल होणार जाहीर; वाचा कुठे पाहता येईल निकाल

लवकरच आयसीएसईचा ऑनलाईन निकाल होणार जाहीर; वाचा कुठे पाहता येईल निकाल
Updated on


मुंबई : आयसीएसई मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल उद्या (ता. 10) दुपारी 3 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे निकाल समजू शकणार आहे. तसेच www.cisce.org, www.result.cisce.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. ज्या विषयांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत, त्याच उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणीसाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यापासून करिअर पोर्टलद्वारे विद्यार्थी 16 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. पुनर्तपासणीसाठी प्रत्येकी विषयासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

एसएमएसद्वारे निकाल पाहण्यासाठी
ICSE-unique ID
ISE-unique ID
टाईप करून 09248082883 वर पाठवता येईल.

ICSE online results to be announced soon; Read the results

---------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.