मुंबईतील आयसीयू , व्हेंटिलेटर बेडसचा वापरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ

मुंबईत 4 जानेवारीपासून अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू बेडच्या वापरात जवळपास 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि व्हेंटिलेटर बेडचा वापर जवळपास 11 टक्क्यांनी वाढला आहे.
ventilator bed
ventilator bedsakal
Updated on
Summary

मुंबईत 4 जानेवारीपासून अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू बेडच्या वापरात जवळपास 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि व्हेंटिलेटर बेडचा वापर जवळपास 11 टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई - मुंबईत 4 जानेवारीपासून अतिदक्षता विभाग (ICU) म्हणजेच आयसीयू बेडच्या (ICU Beds) वापरात (Use) जवळपास 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि व्हेंटिलेटर बेडचा (Ventilator Beds) वापर जवळपास 11 टक्क्यांनी वाढला (Increase) आहे. यासह ऑक्सिजन बेडचा वापरही दुप्पट झाला आहे.

मात्र, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात ऑक्सिजनचा वापर अंदाजित 5% ने वाढला आहे ज्यातुन ऑक्सिजन बेडवर असलेले रुग्ण सौम्य ऑक्सिजन थेरपीनेच बरे होत असल्याचे स्पष्ट होते.

पालिकेच्या आकडेवारीनुसार, 4 जानेवारी रोजी 11,998 ऑक्सिजन बेड, 2,577 आयसीयू बेड आणि 1,368 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होते. त्या दिवशी 1,374 ऑक्सिजन बेड, 507 आयसीयु बेड आणि 320 व्हेंटिलेटर बेडस भरले होते ज्याचे प्रमाण अनुक्रमे 11.5%, 19.67% आणि 23.39% एवढे होते. तर, 12 दिवसानंतर 15 जानेवारी रोजी शहरात 12,280 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होते, त्यासह आयसीयु बेड्स 3,166 आणि व्हेंटिलेटर बेड्स 1,567 होते. त्यापैकी अनुक्रमे 2, 650, 987 आणि 594 एवढे बेड्स भरलेले होते. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात बेड्स शिल्लक असून गंभीर असणार्या कोविड-19 रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

ventilator bed
मुंबई : 4000 आरोग्य सेविकांचे कामबंद

दरम्यान, ऑक्सिजन थेरपी आणि अतिदक्षता उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही शहरातील ऑक्सिजनचा वापर फारसा वाढलेला नाही, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. “सध्या शहरात दररोज सुमारे 30 ते 35 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होत आहे,” असे मुंबईचा ऑक्सिजन पुरवठा आणि वितरणाची जबाबदारी असणारे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू म्हणाले.

'दुसऱ्या लाटेच्या शिखरावर आम्हाला जी भीती होती त्यापैकी ही 25 टक्के परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजन बेड्सचा वापर दुप्पट झाला असला तरीही, ऑक्सिजनचा वापर केवळ 5% वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात 30 ते 25 मेट्रिक टन एवढा वापर झाला आहे. गेल्या लाटेत 140 ते 150 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर केला होता.

यामध्ये कोविड आयसीयू बेडमधील ऑक्सिजनचा वापर तसेच नॉन-कोविड संबंधित उपचारांचा समावेश आहे.

मुंबईतील ऑक्सिजनची क्षमता -

मुंबईची एकूण ऑक्सिजन क्षमता 900 मेट्रिक टन आहे ज्यात 40 पेक्षा जास्त प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (पीएसए ) प्लांट आहेत ज्यात 300 मेट्रिक क्षमतेचे आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ ) स्टोरेज टँक आहेत, जे रुग्णालयांत उपलब्ध असतात. आम्ही अद्याप पीएसए प्लांट वापरण्यास सुरुवात केलेली नाही, कारण सध्या एलएमओची क्षमता पुरेशी आहे, ओमिक्रॉन लाटेत बाधित रुग्णांना छातीच्या वरील भागातच संसर्ग होत असल्याने ऑक्सिजनची जास्त गरज भासत नाही असेही वेलरासू यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.