संतप्त मूर्तिकार आंदोलनाच्या पवित्र्यात, मंडप परवानगीसाठी सरकारकडून अजूनही निर्देश नाही..

ganesh making
ganesh making
Updated on

मुंबई: यंदाच्या वर्षी गणपतीच्या मूर्ती 4 फूटाची ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचे मूर्तिकारांनी स्वागत केले. पण अजूनपर्यंत मूर्तिकारांना मूर्ती तयार करण्यासाठी मंडप परवानगी मुंबई महापालिकेने दिल्या नाहीत. 

मुंबई महापालिकेने  राज्य सरकारचे पुढील निर्देश येईपर्यंत मंडप परवानगी देण्यात येऊ नये असे निर्देश काढला. राज्य सरकार मूर्तिकारांच्या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहत नाही. मूर्ती बनवण्यासाठी जागा नसेल तर मूर्ती कशा तयार केल्या जातील. राज्य सरकार व मुंबई महापालिकेने 1 जुलैपर्यंत मंडप परवानगीसाठी निर्देश जारी केले नाहीतर मूर्तिकार मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण कार्यालय बाहेर आंदोलन करतील, असा इशारा बृहन्मुंबई मूर्तिकार संघाने दिला आहे. 

गणेशोत्सवाला दीड महिना बाकी आहे. जून संपत आला तरी गणेश मूर्तिकारांना अजून मूर्ती घडवण्यासाठी मंडप परवानगी दिल्या नाहीत. गणेश मूर्तीच्या उंचीबाबत निर्णय झाला. पण ती घडवण्यासाठी जागा नसेल तर मूर्ती घडणार कशी, गणेशोत्सव होणार कसा असा सवाल मूर्तिकारांकडून केला जात आहे. राज्य सरकार व मुंबई महापालिका मंडप परवानगीासाठी निर्देश काढणार कधी, आधीच खूप कमी वेळ हातात आहे. 

एवढ्या कमी ग्राहकांच्या आणि मंडळांच्या मूर्ती घडवायच्या कशा असा पेच मुंबईतील मूर्तिकारांसमोर उभा राहिला. केवळ पाच टक्के मूर्तिकारांकडे स्वतःची जागा आहे. उर्वरित मूर्तिकारांचा व्यवसाय महापालिकेकडून मिळणाऱ्या मंडपाच्या जागेवरच चालतो. अशी परिस्थिती असतानाही मंडप परवानगी का दिली जात नाही, असा सवाल बृहन्मुंबई मूर्तिकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी उपस्थित केला. 

मूर्तीच नसेल गणेशोत्सव कसा साजरा होणार  याचा विचार राज्य सरकारने केला पाहिजे. मूर्तिकारांना मंडपाची जागा कमी दिली तरी चालेल, मंडप यावर्षी महापालिकेच्या मैदान उभारले तेथे काम करण्यास परवानगी दिली, तरी मूर्तिकारांची हरकत नाही. राज्य सरकारचे सर्व निर्देश पाळून मूर्तिकार काम करणार आहे. त्यामुळे  मंडप परवानगी बाबत त्वरीत निर्णय द्या, असे मत तोंडळकर यांनी व्यक्त केले. 

"सोमवारी मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री व मुंबई महापालिकेचे आयुक्त व सहआयुक्त यांना परवानगी बाबत निर्णय़ जाहीर करण्यासाठी संघाकडून निवेदन देण्यात येईल. याबाबत  येत्या बुधवारपर्यंत निर्णय जाहीर न झाल्यास बृहन्मुंबई मूर्तिकार संघाचे काही प्रतिनिधी  एफ दक्षिण मुंबई महापालिकेच्या परळ येथील कार्यालयाबाहेर रस्त्यावर गणपतीची मूर्ती तयार करण्यास सुरूवात करून आंदोलन करतील", बृहन्मुंबई मूर्तिकार संघाचे  अध्यक्ष  गजानन तोंडवळकर म्हणाले. 

idol makers will do protest against state government 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.