"कोकणची पुन्हा नवी थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनताच प्रश्न विचारेल"
मुंबई: तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा महाराष्ट्रातील किनारपट्टीलगतच्या भागांना बसला. कोकणात (Konkan) या वादळाने खूप नुकसान केले. या नुकसानीची (Damage) पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोकणाचा तीन तासांचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यावर प्रचंड टीका केली जात आहे. त्यातच भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी त्यांच्यावर टीका केली. "कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन, अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख (Shivsena Supreme) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मनोहर जोशी (Manohar Joshi) मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटलं असतं?", असा सवाल केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला केला. (If Balasaheb Thackeray was alive today, what would he have thought after seeing the Konkan Damage)
"ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं, त्या शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडून दिले. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या कोकणाच्या कोकणवासीयांची निराशा उद्धव ठाकरे सरकारने केली. गेल्या वर्षी निसर्ग वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्पेटवर उभे राहून दुरूनच पाहणीचे नाटक केले होते. त्या वेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही, आणि मुख्यमंत्र्यांना याचा पत्ताच नाही", असं ट्वीट त्यांनी केले.
"आता मुख्यमंत्री आताच्या संकटाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याची खोटी आश्वासने देत आहेत. गेल्या वर्षी भरडलेल्या कोकणची पुन्हा नवी थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोकणी जनताच प्रश्न विचारेल हे नक्की", असं त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.