मुंबई, ता. २५ ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना-भाजप नेत्यांची मुंबई, दिल्लीत खलबते सुरू आहेत. ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली. निकालानंतर मात्र मुख्यमंत्री बदलल्यास मतदारांमध्ये वेगळा मेसेज जाण्याची भीती शिवसेना नेत्यांनी बोलून दाखवली. तसेच यातून मरगळलेल्या विरोधी पक्षाच्या हाती विशेषतः ठाकरे गटाच्या हाती आयते कोलीत मिळेल, असेही शिवसेना नेते सांगतात.