मुंबई - शिवसेनेने ठरवले तर भाजप नेत्यांना मुंबईत फिरणेही अशक्य होईल, असा इशारा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना दिला.
भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणले तर मुंबईत फिरणे अशक्य होईल, असा थेट इशारा दिला.
आशिष शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू न करायला हे बापाचे राज्य आहे का, असे विधान केले होते. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे. जयंत पाटील म्हणाले, भाजपने इतके घसरण्याची गरज नाही. मला वाटते त्यांना आशा होती, ती पूर्ण झाली नाही. म्हणूनच भाजप चिडली आहे आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेली.
आपण कुणाचा बाप काढतो आहोत याचंही यांना भान राहिलेले नाही. ते ज्यांचा बाप काढतात त्यांनी जर मनात आणले तर यांना मुंबईत फिरणे देखील अशक्य होईल. मात्र, इतकी पातळी घसरण्याची भाजपवर का वेळ आली यावर भाजपने आत्मचिंतन करावे, असा चिमटाही जयंत पाटील यांनी काढला.
if shivsena decides bjp will not be able tome rome in mumbai says jayant patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.