ठाणे : केंद्र आणि राज्य शासनामार्फत कोरोनाबाबतच्या अटी शिथील केल्या आहेत. त्यानुसार आता महापालिकेकडूनही तसे आदेश पारित करण्यात येणार आहेत. तरीही ठाणेकरांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत प्रशासनाला साथ दिल्यास येत्या दहा ते पंधरा दिवसात कोरोनावर मात करणे शक्य आहे, असा विश्वास ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी व्यक्त केला.
महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सोमवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ठाणेकरांशी संवाद साधला. डिजी ठाणेच्यावतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. यावेळी त्यांनी झोपडपट्टी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे सांगितले. परंतु दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 45 टक्के इतके असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्याच्या तुलनेत ठाण्यात मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे सांगून सिंघल यांनी सांगितले. समाजातील 50 वर्षे वयोगटातील नागरिकांनी आणि 10 वर्षाच्या आतील मुलांनी घरीच राहण्याची आवश्कता असल्याचे सांगून, प्रत्येक व्यक्तींनी कामावर जातांना ताप आहे किंवा नाही, ऑक्सीजनचे प्रमाण किती आहे, हे तपासूनच घराबाहेर पडावे, बाहेर पडताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरात सध्या 88 च्या आसपास रुग्णवाहिका उपलब्ध असून येत्या काही दिवसात 100 हून अधिक रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील कोरोना रुग्णालयांमध्ये किती बेड शिल्लक आहेत, याची माहितीही आता संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. झोपडपट्टी भागात 50 फिव्हर क्लिनिक्स सुरु कले आहेत. जवळपास एक हजार जणांचे पथक ही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. हे पथक कन्टेन्मेंट झोनमध्येही जाऊन काम करणार आहेत अशी माहिती सिंघल यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांसाठी ग्लोबल इम्कॅप्ट हब येथे एक हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरु आहे. तसेच म्हाडा अंतर्गतही एक हजार बेडचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. सद्यस्थितीत शहरात आठ हजार बेड उपलब्ध असल्याचेही सिंघल यांनी स्पष्ट केले. तसेच पालिका परिसरात घरोघरी जाऊन अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वापटही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम सुरु आहे. तसेच आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका देखील सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
झोपडपट्टी भागात ड्रोनव्दारे नजर
ठाण्यात नियम शिथील करण्यात येत असले तरी दुकाने सुरु करण्याबाबतही खरबदारी घेतली जाणार आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूची एका दिवशी आणि रस्त्याच्या उजव्या बाजूची एका दिवशी अशी आलटून पालटून दुकाने उघडी ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय झोपडपटटी भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.