मुंबई: महाराष्ट्रात आज लॉकडाउनचा पहिला टप्पा संपणार आहे. १५ एप्रिलला १५ दिवसांसाठी लॉकडाउन लावण्यात आला होता. पहिल्या टप्प्यातील हा लॉकडाउन यशस्वी ठरला का? याबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनयाचे संचालक तात्याराव लहाने यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. "पहिले १५ दिवस लॉकडाउन लावला त्यानंतर तीन-चार दिवसांनी लॉकडाउन आणखी कठोर केला. मुंबई ठाणे, पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी रुग्णसंख्या स्थिरावरली आहे."
"नागपूर आणि ग्रामीण भागात अजनूही रुग्णसंख्या स्थिरावलेली नाही. पण लॉकडाउनचा निश्चित फायदा झाला आहे" असे तात्याराव लहाने यांनी सांगितले. "आज बेड, ऑक्सिनज, व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. १५ दिवसांपूर्वी या सर्व गोष्टींची चणचण होती" असे तात्याराव लहाने म्हणाले. "लॉकडाउन लावल्यानंतर पहिल्या १४ दिवसात रुग्णसंख्या कमी होत नाही. कोरोनाची बाधा झाल्यानंतर १४ दिवस संसर्ग राहतो. त्यानंतर लोकांनी बंधन पाळली, तर संसर्ग कमी होत जातो. तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात लॉकडाउनचे परिणाम दिसतात" असे तात्याराव लहाने म्हणाले.
लसींच्या कमतरेतबद्दल ते म्हणाले की, "आपल्याकडे कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन करणाऱ्या दोनच कंपन्या आहेत. लसींची उत्पादन क्षमता आणि लोकसंख्या यात अंतर आहे. लसीचा पहिला डोस संरक्षणासाठी दिला, तर दुसरा डोस प्रायोरीटीने दिला जाईल. इंग्लंडमध्ये पहिला डोस दिल्यानंतर तीन महिन्यांनी दुसरा डोस दिला. इंग्लंड तर प्रगत राष्ट्र आहे. पहिला डोस दिल्यानंतर दुसऱ्या डोससाठी ते तीन महिने थांबले. आपण तर प्रगतीशील देश आहोत."
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळत नसल्यामुळे नागरीकांच्या मनात चिंता आहे, याबद्दल तात्याराव लहानेना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, "कोव्हीशिल्डचा पहिला डोस ज्यांनी घेतलाय, ते तीन महिन्यात दुसरा डोस कधीही घेऊ शकतात. ज्यांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलाय आणि दुसऱ्या डोसला सात ते आठ दिवस जास्त लागले तर घाबरु नका. शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज स्थिर असतात. त्यामुळे थोडा विलंब लागला तर चिंता करु नका."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.