मुंबई : मुंबईत सध्या कोस्टल रोडचं काम सुरु आहे. त्यात मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोस्टल रोड प्रकल्पात आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जातेय. या प्रकल्पामुळे पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच या प्रकल्पातील कामांमुळे पाणी सचल्यास तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान आणि वरळी डेअरी या ३ ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेत. महापालिकेनं याबाबतची माहिती दिली आहे.
महत्वाची बातमी : मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, आज असा असेल पावसाचा जोर
दक्षिण मुंबईतील शामलदास गांधी मार्ग, गिरगाव ते राजीव गांधी सागरी सेतू, वरळी यांना जोडणाऱ्या ९.९८ किमीच्या कोस्टल रोडचे काम सुरु करण्यात आलं आहे. बांधकाम सुरू असलेल्या भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी संबंधित नियंत्रण कक्षाकडे किंवा पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन कोस्टल रोडचे प्रभारी प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी केलंय.
नागरिक येथे तक्रार नोंदवू शकता
अमरसन्स उद्यान नियंत्रण कक्ष
वरळी डेअरी नियंत्रण कक्ष
प्रियदर्शिनी उद्यान एमएसआरडी नियंत्रण कक्ष
If there is water in this part of Mumbai report it read detail story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.