PUB-G खेळा, पैसे कमवा, करिअर देखील घडवा..

PUB-G खेळा, पैसे कमवा, करिअर देखील घडवा..
Updated on

मुंबई : ऑनलाईन गेमिंगमधून (Online Gaming) पैसे कमवण्याबरोबरच करियरच्या संधीही आहेत. याची तरुणांना जाणीव करून देण्यासाठी यंदा आयआयटी मुंबई (IIT Bombay)  टेकफेस्टमध्ये (Pub G) पबजी-मोबाईल कॉम्पिटिशन ( Mobile Gaming Competition ) घेण्यात येणार आहे. टेकफेस्टच्या (Techfest) इतिहासात अशी स्पर्धा प्रथमच घेण्यात येत आहे. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

विद्यार्थ्यांमधील तंत्रज्ञान विकास करण्याच्या क्षमतेला चालना मिळावी यासाठी 1998 मध्ये प्रथमच आयआयटी मुंबईमध्ये टेकफेस्ट सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या संशोधन शक्तीला मिळणारी चालना, विविध कल्पना, स्पर्धा यामुळे अल्पावधीतच हा महोत्सव आशियातील सर्वात मोठा विज्ञान व तंत्रज्ञान महोत्सव म्हणून ओळखला जाऊ लागला.

आशियातील सर्वात मोठा असलेला आयआयटी टेकफेस्ट 3 ते 5 जानेवारी दरम्यान होत आहे. यंदाच्या टेकफेस्टचे वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये गेमर्स लीगमध्ये लोकप्रिय पबजीबरोबरच काही वर्षांपासून सीएस गो ( Counter Strike ) खेळणाऱ्यांचा सामनाही रंगणार आहे. दोन्ही खेळांतील विजेत्यांना दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.

आतापर्यंत प्रत्येकी 4 जणांच्या 256 टीम्सने या पबजी मोबाईल ई स्पोर्टस कॉम्पिटिशनमध्ये नोंदणी केली आहे. PUB G पबजी साठी नोंदणी करणाऱ्या संघांचे आपापसात सामने होतील त्यानंतर त्यातील सर्वोत्तम 16 संघांचे टेकफेस्टमध्ये 3 ते 5 जानेवारी 2020 या कालावधीत सामने होणार आहेत.

देशांत विशेषतः बाहेरच्या देशांतही तरुणाईला या गेम्सने भुरळ पाडली आहे मात्र या गेम्सकडे करिअरची संधी म्हणून इतर देशांतील तरुणाई वापर करून घेत आहे. तोच धडा येथील तंत्रवेड्या तरुणाईने घेऊन करिअरचा एक उत्तम पर्याय म्हणून या गेम्सकडे पहावे हा या स्पर्धेचा उद्देश असल्याचे ई स्पोर्टस हेड प्रतीक मोहनानी याने स्पष्ट केले.  

WebTitle :  IIT bombay to conduct pub g and counter strike competition during techfest

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()